दि. 28 ऑक्टोबर :रोजी सेवा प्राय: संस्थेत सुवर्णप्राशन डोस आयोजित केला होता. या डोस चा फायदा 16 वर्षाखालील सर्व बालकांना होतो. यामध्ये बालकांची रोग रोग प्रतिकार शक्ती वाढते, मेंदूचा सर्वांगीण विकास घडून येतो, स्मरणशक्ती आकलनशक्ती व एकाग्रता वाढते, शारीरिक व मानसिक वाढ होण्यास मदत होते तसेच पचनशक्ती वाढून जे बालक वारंवार आजारी पडत असतात त्यांनादेखील याचा फायदा होतो.
आरोग्य शिबिराचे उद्घाटन माननीय चंद्रकला ताई साबळे व माननीय सुरेखाताई निमसे यांच्या हस्ते झाले तसेच माननीय सागर आप्पा आढाव, माननीय दीपक दिनकर आढाव, माननीय डॉ कपिल झोटिंग तसेच संस्थेचे सचिव माननीय सचिन बागुल संस्थेच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी माननीय चौधरी मॅडम संस्थेचे अध्यक्ष माननीय पंकज कुलकर्णी, सदस्य माननीय अजय गव्हाणे हे यावेळी उपस्थित होते. सुवर्ण प्राशन शिबिरात या वेळी परिसरातील 65 बालकांनी सहभाग घेतला.
