सायबर पोलिसांची उत्तम कामगिरी

नाशिक मिरर वेबटीम : सन २०१९ ते २०२० साला दरम्यान सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेले (गहाळ झालेले)सुमारे ५० अर्ज प्राप्त झाले होते.त्यातील सर्वच अर्ज सातपूर पोलिसांनी पोलीस आयुक्तालयातील सायबर सेल पोलिस ठाण्यात वर्ग केले होते.सायबर सेलने सदर गहाळ झालेले मोबाईल ट्रॅक करुन हस्तगत करुन सातपूर पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.दरम्यान सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला पोलीस दामिनी कांदळकर गोसावी व श्रीकांत साळवे यांनी पूर्ण तपास करून आता पर्यत तेरा जणांचे गहाळ झालेले मोबाईल ओळख पटवून परत देण्यात आले आहे.
याही पुढे सायबर सेलच्या माध्यमातून जसजसे मोबाईल शोधण्यात येतील ते गहाळ मोबाईल ओळख पटवून परत देण्यात येतील. असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश हांडे यानी सातपुर पोलिस स्टेशनला येतील तसे लोकांना कळवून फोन तक्रारदारना वर्ग करण्यात येतील असे सांगितले.

बातम्या

Don`t copy text!