दोन लाखाची लाचखोरी प्रकरण
नाशिक मिरर वेबटीम : जळगाव पत्नीच्या नावावर असलेली शेती करून द्यावी, अशी मागणी तक्रारदाराने केली होती. दोन लाखाची लाच मागणाऱ्या बोदवड तहसीलदार यांच्यासह सर्कल व तलाठ्यास जळगांव एसीबीच्या पथकाने लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. यामुळे महसूल विभागात एकचं खळबळ उडाली आहे . हेमंत पाटील, तलाठी निरज पाटील व मंडल अधिकारी संजय शिरनाथ यांना ताब्यात घेण्यात आले आहे. बोदवड तालुक्यातील एका तक्रारदाराने २००२ मध्ये लग्न केल्यावर शेती खरेदी केली होती. मात्र काही वर्षांनी पुन्हा ती जमीन पुन्हा मूळ मालकाच्या झाल्यानंतर तक्रारदाराने मंडळ अधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब आणून दिल्यानंतर पुन्हा तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावावर शेती करण्यात आली. मात्र तहसीलदार यांनी या बाबीस आक्षेप घेत नोटीस काढली व कागदपत्रांमधील त्रुटी असल्याने ही शेती सरकार जमा होईल. अशी भीती घातली या दरम्यान मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यामार्फत नोटीस रद्द करून शेती नावावर करण्यासाठी पाच लाखांची लाच मागण्यात आली. मात्र दोन लेखात तोडजोड करण्यात करण्याचे ठरले.व तक्रारदारांनी तक्रार दिली. तहसीलदार मंडळ अधिकारी व सर्कल यांच्याविरुद्ध तक्रार आल्याने सुरुवातीला तलाठी मंडल अधिकारी यांच्या लाच मागणीबाबत पडताळणी करण्यात आल्यानंतर, तहसीलदारांनी लाच मागणी केल्याचे सिद्ध झाल्यानंतर शुक्रवारी दुपारी सापळा रचण्यात आला. तहसीलदारांच्या कार्यलयाची झडती घेण्यात आली. तर दुसरे पथक जामनेर येथे रवाना झाल्याचे समजते. मंडळ अधिकारी यांनी लाच स्वीकारताच त्याच्या नंतर दोघांना अटक करण्यात आली. ही सर्व कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपाधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाली.
