नाशिक मिरर वेबटीम :
चांदवड शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील चौफुलीवर खाजगी बस व गॅस टँकर यांच्यात भीषण अपघात झाल्याची घटना दिनांक १८ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान घडली. अपघातानंतर खाजगी बस महामार्गावर पलटी होऊन महामार्गाच्या कडेवर उभी असलेली काळी पिवळी ओमनी, टपऱ्याना धडकल्याने त्यांचा अक्षरशः चुराडा झाला, या अपघातात पहाटेच्या वेळी फिरायला गेलेल्या शहरातील एका नागरिकाचा जागीच मृत्यू झाला सुदैवाने खाजगी बस मधील मुंबई मुंबईकडे जात असलेले युपी बिहार राज्यातील शंभर ते सव्वाशे मजूर सुखरूप असल्याने मोठी दुर्घटना टळली.या घटनेची माहिती मिळताच चांदवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बारावकर हे घटनास्थळी दाखल झाले पुढील तपास पोलिस करीत आहे
