नाशिक मिरर वृत्तसेवा दि.१८: जेलरोड येथील सेवा प्राय: चॅरिटेबल ट्रस्टचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 17 ऑक्टोबर रोजी महिलांचे आजार यावर आरोग्य तपासणी करण्यात आली व 18 ऑक्टोबर रोजी सर्वांसाठी आरोग्य तपासणी शिबीर होते. संस्थेचे उद्घाटन मागील वर्षी नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते करण्यात आले होते. आज 18 ऑक्टोबर रोजी नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी संस्थेचे अध्यक्ष श्री पंकज कुलकर्णी यांना फोन करून संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. सेवा प्राय: चॅरिटेबल ट्रस्ट आरोग्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहे. कोरोना काळात देखील संस्थेने RTPCR ही चाचणी अत्यंत माफक किमतीत उपलब्ध करून दिली होती तसेच संस्थेने आता रक्त तापसणीकरिता krsna डायगणोस्टिक्स या कंपनी सोबत करार करून रक्त तपासणी साठी इतरांपेक्षा जवळ जवळ 50% कमी किंमत मध्ये उपलब्ध करून दिली आहे. एक्स रे सुविधा देखील संस्थेत उपलब्ध आहे. संस्थेत सेवा देण्याकरिता विविध डॉक्टर्स येत असतात त्यात एम. डी. मेडिसिन, एम. डी. आयुर्वेद, होमिओपॅथी तज्ञ उपलब्ध आहेत. आयुर्वेद, होमिओपॅथी तसेच ऍलोपॅथी असे सर्वच उपचार पद्धती संस्थेने उपलब्ध करून दिल्या आहेत. वर्धापन दिना निमित्त विविध मान्यवरांनी संस्थेस भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

 

बातम्या

Don`t copy text!