नाशिक मिरर : प्रतिनिधी

कोरोना काळ हा काळाकुट्ट  होता. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला. जगभरात हे घडले. मानवतेची कसोटी यावेळी लागली होती. मात्र, योग, निसर्गोपचार व आयुर्वेदाची त्रिसूत्री स्वीकारणारे यातून वाचले. ही निसर्गविद्या आपल्याला स्वतःचा अभ्यास करायला शिकवते, असे प्रतिपादन योगतज्ज्ञ राज सिन्नरकर यांनी केले.

यांची उपस्थिती

श्रीमती पुष्पावतीबाई चॅरिटेबल ट्रस्ट, नाशिक संचलित निसर्ग विद्या निकेतन या निसर्गोपचार व योग अकादमीच्या निसर्गोपचार पदविकेचा शुभारंभ विजयादशमीच्या मुहूर्तावर झाला. याप्रसंगी सिन्नरकर बोलत होते. यावेळी तस्मिना शेख, सुनिता पाटील, रणजित पाटील, संध्या सोमय्या, पुरूषोत्तम सावंत, तुषार विसपुते, पंकज पटेल आदी उपस्थित होते.

निसर्गोपचाराने दृष्टी बदलेल

सिन्नरकर म्हणाले की, निसर्गोपचाराच्या ज्ञानाने आपली दृष्टी बदलेल. सर्दी, ताप, उलट्या, जुलाब हे निसर्गाने केलेल्या युक्त्या आहेत. त्यामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर फेकली जातात. निसर्गोपचार आपल्याला स्वतःच स्वतःला ओळखायला शिकवतो. मनातीलही दोष काढतो.

निसर्गाची पाठशाळा

निसर्गोपचार ही निसर्गाची पाठशाळा आहे. यात माती, पाणी, सूर्यप्रकाश, वायू हे आपल्याला स्वतःवर कसा उपचार करायचा हे शिकवेल. म्हणूनच म्हणतात, `मिट्टी, पाणी, धूप, हवा – सब रोगो की यही दवा.’ आपले शरीर पंचमहाभौतिक तत्त्वाने बनलेले आहे. त्यामुळे ही पंचमहाभौतिक तत्त्वच आपल्या शरीराला बरे करतील, असेही सिन्नरकर म्हणाले.

बातम्या

Don`t copy text!