नाशिक मिरर : म्हसरूळ प्रतिनिधी
येथील सार्वजनिक वाचनालयात `एक गाव-एक गणपती’ च्या संकल्पनेवर ग्रामस्थांची बैठक झाली. म्हसरूळ पोलिस ठाण्याकडून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी सार्वजनिक वाचनालय व ग्रामस्थांच्यावतीने म्हसरूळ पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित वरीष्ठ पोलीस निरीक्षक भरतकुमार सूर्यवंशी यांचा सत्कार सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक प्रभाकर रायते व माजी नगरसेवक वसंतराव मोराडे यांनी केला. `एक गाव- एक गणपतीʼची संकल्पना पोलीस ठाण्याच्यावतीने मांडण्यात आली. प्रभाकर रायते यांनी प्रस्तावना केली. याप्रसंगी विनायक सूर्यवंशी, पद्माकर मोराडे, गणेश पेलमहाले, सुनील परदेशी, सुनील निरगुडे यांनी मत मांडले.
कोविड19च्या शासकीय नियमानुसार सर्व उत्सव साजरा करावे, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी केले. सहायक पोलीस निरीक्षक पवार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी रोहिणी दळवी, अंजली कुलकर्णी, संजना पगार, शीतल चंदात्रे, रुंजा आप्पा मोराडे, विष्णू सातकर, प्रकाश उखाडे, देवकिसन व्यास, बाळासाहेब उखाडे, रवी मोराडे, योगेश मोराडे, विशाल मोराडे, गुलाब गरूड, राजू थोरात, प्रशांत मोराडे, तुकाराम बोरस्ते, सुनिल मोराडे, अशोक वराडे, रघुनाथ गुंजाळ, नितीन पगारे, विलास लांडे, भरत विनकर, पोलीस नाईक अरगडे, गोपनीयचे नितीन तुपलोंढे भुसारे, पवार, गावीत आदी उपस्थितीत होते.
