सातपूर : नाशिक मिरर सातपूर येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या तसेच आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने जनता कला व वाणिज्य महाविद्यालय सातपूर येथे क्रीडा विभागाच्या पुढाकाराने ऑनलाईन पद्धतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी.उशीर होते. कोरोनाने नेहमीच्या जीवनापेक्षा वेगळे जीवन जगण्यास भाग पाडले, नातेसंबंधात दुरावा निर्माण केला, सर्व सामाजिक उपक्रम वैयक्तिक पातळीवर साजरे केले जाऊ लागले, ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा उदय झाला,भविष्यात येणाऱ्या संसर्गजन्य आजारांविरोधात लढण्यास आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. सरकारी कामांमध्ये पारदर्शकता आणि वेग वाढला आहे असे प्रतिपादन प्रा. शिवाजी सुंभे यांनी केले.कोविडची सुरुवातीची लाट आणि त्यामुळे समाजावर झालेले दुष्परिणाम यांचे विश्लेषण आकडेवारीच्या साह्याने त्यांनी केले भारत सरकारने विविध प्रकारच्या आरोग्यविषयक योजना लोकांसाठी लागू करून व विमा कंपन्यांना अनुदान देऊन लोकांना कोरोणा मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले, यापुढे मात्र आपले आरोग्य, आपले कुटुंब आपणासच सांभाळावे लागेल, तेव्हा आपण सर्व सजग होऊ या निर्भय होऊ या आणि कोणाला हरवू या, असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले. अध्यक्षीय भाषणात माननीय प्राचार्यांनी आरोग्य सेतू ॲपचे महत्त्व विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा संचालिका प्रा. संगीता गाडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. मच्छिंद्र शेंडगे, डॉ. सचिन राजोळे प्रा. गणेश पानपाटील, प्रा. स्वप्नील साखला, प्रा. श्रीमती सोनाली आहेर, ग्रंथपाल जाधव, कार्यालयीन अधिक्षक श्री तुकाराम जाधव यांनी विशेष प्रयत्न केले.
