‘महाराष्ट्र दर्शन’ दिवाळी अंकाचे प्रकाशन
सातपूर :नाशिक मिरर वेबटीम पत्रकार व लेखक आपल्या लेखणीतून समाज प्रबोधनयुक्त काम करीत असतात. नवीन तंत्रज्ञान युगात जुन्या पारंपारिक संस्कृती टिकून ठेवणे ही आजच्या काळची गरज आहे. दर्पणकार पत्रकार संघाच्या वतीने गेली १४ वर्षापासून समाज प्रबोधन व संस्कृती टिकवण्याचे काम दिवाळी अंकाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू असल्याची प्रतिक्रिया प्रभाग क्रमांक १० च्या नगरसेविका माधुरी बोलकर यांनी आपले मत अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. दर्पणकार पत्रकार संघाच्या वतीने सातपूर येथे दि.४ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी अंक प्रकाशनसोहळा प्रसंगी व्यक्त केले.

सातपूर : महाराष्ट्र दर्शन दिवाळी अंकाचे प्रकाशन करतेवेळी दर्पणकार पत्रकार संघाचे पदाधिकारी समवेत नगरसेविका माधुरी बोलकर , पत्रकार रवींद्र केडीया, प्रा.संजय जाधव,दादासाहेब भागवत, रेखा पोखरकर आदी.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार रवींद्र केडीया, पत्रकार गोकुळ सोनवणे, प्राध्यापक संजय जाधव, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र शिंदे उपस्थित होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना प्रा.संजय जाधव म्हणाले की, जागतीक स्थरावर भारतीय संस्कृती ही सर्व श्रेष्ठ असून त्याची जपणूक आपण केली पाहिजे. नवीन तंत्र ज्ञान अवगत करून अधिक वाचनाच्या माध्यमातूनच प्रगतीचा कळस गाठता येऊ शकतो. त्यासाठी आपल्या पाल्याना वाचन संस्कृती मार्गदर्शन केले पाहिजे.असे ते म्हणाले. गुणवंत नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित प्रमुख अतिथी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात पत्रकार संघाचे संस्थापक आबासाहेब एरंडे यांनी संस्थेच्या कार्यप्रणाली दिवाळी अंक, परंपरागत संस्कृती व वनाधिपती कै.विनाकदादा पाटील याच्या समवेत उपस्थित झालेले कार्यक्रमची आठवण, साहित्य संमेलनाचे व कार्याची आठवणीची माहिती देवून त्याच्या आठवणींना उजाळा दिला.यावेळी सूत्रसंचालन रेखा पोखरकर यांनी केले. उपस्थिती पाहुण्यांचे आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर आंधळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पत्रकार सागर आनप, राजेश पांडे , अनिल शिंदे , दादासाहेब भागवत, अशोक सोनवणे, जगन्नाथ काळे,प्रदीप कापसे,मदन बोरसे, अनिल गोसावी, यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी परिसरातील जेष्ठ नागरिक देखील उपस्थित होते.
