द्राक्ष बागा संकटात
शहरात देखील कडाक्याची थंडी; तरुणांही थंडीचा आनंद घेत आहे.
नाशिक मिरर वेबटीम : निफाड
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात थंडी चा कडाका वाढतंच असून मंगळवार दि २२ रोजी पारा ६.५ अंशापर्यंत घसरल्याची नोंद कुंदेवाडी येथील गहु संशोधन केंद्रावर करण्यात आली. रब्बीसाठी पोषक हवामान होत असले तरी द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढली आहे.द्राक्ष बागातील द्राक्ष चे मनी तडकले आहे.यामुळे नाशिक जिल्ह्यातील निफाड, पिंपळगाव बसवंत , दिंडोरी,पिंपळगाव बाहुला व इतर तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर द्राक्षे शेती केली जाते .या ठिकाणाच्या शेतकऱ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, द्राक्ष बागा वाचवण्यासाठी विविध उपाययोजना करून धडपड करीत असल्याचे दिसून येत आहे. उत्तरेकडील राज्यात बर्फ दृष्टी होत असल्याने किमान तापमान उणे झाले त्यामुळे उत्तरेकडून येणार्या थंड वार्यांमुळे विश्रांती घेतलेल्या थंडीचे जोरदार आगमन झाले आहे. राज्यातील तापमानात घसरण होत या हंगामातील किमान तापमानाची ८.२ अंश सेल्सिअसची नोंद सोमवारी दि. २१ रोजी निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथे झाली होती. आज मंगळवार रोजी पारा थेट ६.५ अंशावर घसरला आहे.
कडाक्याच्या थंडीने तालुका गारठल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून नागरिकांनी उब मिळविण्याचा प्रयत्न करत आहे . या थंडीने हरभरा व गव्हाच्या पिकाला या थंडीचा फायदा होणार आहे . द्राक्ष हंगाम ऐन भरात येणार आहे अशा परीस्थीत थंडीने द्राक्षमन्यांना तडे जाण्याची भिती निर्माण झाली आहे द्राक्षवेलीच्या मुळ्या बंद पडणे, द्राक्षघडाचा विकास खुंटणे असे धोके या थंडीमुळे निर्माण झाले आहे पुढिल काहि दिवसात पारा घसरण्याचे संकेत मिळाले आहे तपमानात घट होत असल्याचा द्राक्षबागांना मोठा धोका आहे द्राक्षबागेतिल मुळ्यांचे कार्य सुरळीत राहुन मण्यांना तडे जाऊ नये याकरिता पहाटे पासुन सुर्योदयापर्यंत ठिबक सिंचनद्वारे पाणी देण्याबरोबरच परिपक्व द्राक्षमण्यांना तडा जाऊ नये याकरिता द्राक्षबागेत शेकोटीद्वारे धुर करुन उष्णता निर्माण करावी लागत आहे यातुन द्राक्षमालावरील धोके टाळण्याचा उत्पादक प्रयत्न करत आहेत.
द्राक्षबागेवर सध्या नियमित फवारणी तसेच बदलत्या हवामानामुळे रोग प्रतिबंधात्मक फवारणी सुरु आहे. मावा, तुडतुडे, दावणी, बुरी, थ्रीप्स वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पूर्व खबरदारी म्हणून शेतकऱ्यांनी फवारणी वाढविली. त्यासाठी महागाची औषधे विकत घ्यावी लागत आहेत. एरवी बागेची छाटणी ते माल काढणीपर्यंत एकरी दोन लाखांपर्यंत खर्च येतो. यंदा तो खर्च 20 ते 25 हजारांनी वाढला आहे.
– संदीप जाधव कुंभारी निफाड
