वाढीव वीजबिलचा निषेध करून दिले निवेदन

सातपूर : नाशिक मिरर वेबटीम महाराष्ट्र शासनाने कोरोना काळात वाढीव बिले दिली ही बिले कमी करावी अन्यथा रस्त्यावर उतरून मनसे स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल, असा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. व मनसेचे नगरसेवक सलीम शेख ,योगेश शेवरे,विभागीय अध्यक्ष प्रकाश निगळ,प्रवक्ते शहर सचिव अंबादास आहिरे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. वाढिव बिलाची होळीे करून शासनाचा निषेध करण्यात आला .देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की २२ मार्च २०२० ते जुन २०२० पर्यंत औद्योगिक अस्थापन बंद असताना ,विज वापर झालेला नसतानाही वीज बिल कसे काय आले.घरगुती विज वापर जास्त नसतानांही विज बिल ३ ते ४ पट जास्त आले आहेत.ते आम्ही भरणार नाही.वीज फुकट नको व माफही नको, पण कोणत्या नियमाने विज बिल आकारणी झाली आहे. ते सांगावे व त्याबाबत जनतेला प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर पणे सांगण्यात यावे.वीज मिटरचे पुन्हा रिडींग घेऊन योग्य ते बिल द्यावे.सरासरी वीजबिल देऊन नागरिकांची फसवणूक केली जात आहे.या वाढिव वीज बिला बाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा.नागरिकांचे वीज कनेक्शन खंडित करून नागरिकांना त्रास दिल्यास मनसे रस्त्यावर उतरून कायदा हातात घेऊन जनतेसाठी काम करणार आहे.या सर्व परिस्थितीला सरकार व विद्युत महामंडळ जबाबदार असेल असा ईशारा मनसेच्या वतीने देण्यात आला.यावेळी सातपूर विभागातील मनसे पदाधिकारी,सोपान शहाणे,किशोर वडजे,लक्ष्मण साळवे,गणेश जायभावे,विजय आहिरे,नाना आव्हाड,योगेश लाभडे,वैभव महिरे,विजय जगताप,निरंजन जगताप,प्रवीण भालेराव,प्रकाश गोर्हे,शैलेश बस्ते आदीसह सहकारी,महाराष्ट्र सैनिक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!