रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची मागणी
सातपूर : नाशिक मिरर राज्य सरकारने मास्कचे दर निश्चित केले असून वाढीव दराने विक्री करणाऱ्या मेडिकल दुकानाची तपासणी करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाला (एफडीआय) दिले आहे. कोरोना काळात रिटेलर मेडिकल दुकानादारांनी स्वतः जीव धोक्यात घालून अविरत रुग्णांना औषध सेवा दिली. या ६ महिन्याच्या काळात आधी सॅनिटायझर व आता मास्क तपासणी करून रिटेलरला वेठीस धरण्याचे प्रकार सुरू आहे. त्यामुळे मेडिकल दुकानाची तपासणी करण्याचे आदेश मागे घ्यावा या आशयाचे निवेदन रिटेल केमिस्ट अशोसीएसन च्या वतीने एफडीआय अधिकारी चंद्रकांत मोरे यांना देण्यात आले आहे.किराणा, कपडा दुकानासह रस्त्यावर ही काही विक्रेते सॅनिटायझर व मास्क विकत आहे .तपासणी मात्र रिटेरलचीच होत आहे. ही तपासणी करतांना नाहक त्रास देन्यात येत आहे.शासनाच्या आदेशानुसार एफडीआय ने रिटेरल च्या दुकानात तपासणी करावी मात्र अधिकारऱ्यांनी दुकानदारास त्रास देऊ नये. एकीकडे रिटेरल च्या दुकानाची तपासणी होत असताना कपडा दुकान किराणा दुकान रस्त्यावर खुले आम रस्त्यावर सॅनिटायझर व मास्क विकले जात आहे मात्र त्या वर कारवाई होत नाही. पूर्वग्रहदूषित आदेश काढत कारवाई करत असतील तर रिटेरल दुकानात मास्क व कोव्हिडं संबंधित औषध विकणार नाही, आशा मागण्याचे निवेदन रिटेल केमिस्ट अशोसीएसन च्या वतीने एफडीआय अधिकारी चंद्रकांत मोरे प्रशांत ब्राम्हणकर,एम देशपांडे यांना देण्यात आले या वेळी रिरेटल नाशिक जिल्हा अध्यक्ष धनंजय खाडगीर ,विजय गायखे नाशिक शहर अध्यक्ष,उदय किनगे सेक्रेटरी, नितीन उगले खजिनदार, विजय पाटील महिला संघटक क्रांती कोठावदे,सुनीता माळवदे सह केमिस्ट बांधव उपस्थित होते.
