नाशिक मिरर वेबटीम : जळगाव शहरातील खडका चौफुली येथे आज सकाळी झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, एमएच-१९ झेड ३१९२ क्रमांकाच्या डंपरने शहरातून जाणार्‍या खडका चौफुली येथे दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील पुरूष व महिलेस जबर दुखापत होऊन ते जागीच गतप्राण झाले. यात चंद्रकांत जगन्नाथ वराडे आणि संध्या वराडे हे दोन्ही जण जागीच ठार झाले. हे दोन्ही जण बुलढाणा येथील रहिवासी असून ते विवाहासाठी भुसावळ येथे आले होते.दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आली असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

बातम्या

Don`t copy text!