नाशिक मिरर : म्हसरूळ प्रतिनिधी

नाशिकमधील तिडके नगर येथील कल्याणी जगदीश मोहुर्ले यांनी `गौरी आल्या सोनपाऊलीʼ असे लिहित गौरीचीच प्रतिमा असलेली रांगोळी काढली आहे. ही रांगोळी सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. कल्याणी मोहुर्ले या अनेक वर्षांपासून रांगोळीतून अनेक चित्रे साकारत आहेत. यंदा गौरीच्या आगमनानंतर विविध रंगातील गौरीची रांगोळी काढली आहे. ही रांगोळी पाहण्यासाठी अनेकांनी भेट दिली आहे. विविध सणासुदीला अशाच वैशिष्ट्यपूर्ण रांगोळी काढण्याचा मानस कल्याणी मोहुर्ले यांनी व्यक्त केला आहे.

बातम्या

Don`t copy text!