युवकाची छावा संघटनेला पहिली पंसदी

नाशिक मिरर वेबटीम : महाराष्ट्रामधील शेतकरी प्रश्न असो व मराठा आरक्षण ,विद्यार्थी अडचणी, कामगार होणारी पिळवून अशा अनेक सामाजिक घटनाकाना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रातील छावा क्रांतिवीर सेना नेहमी पुढे राहिली आहे . त्यामुळे छावा चे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वामध्ये अनेक तरुण संघटनेमध्ये जोडले जात असून सदस्य होण्यासाठी नाशिक,मुंबई, पुणे, औरंगाबाद, नगर धुळे, जळगाव आदी सह इतर जिल्हयातुन मोठ्या प्रमाणात युवक प्रवेश करून सदर भागात व कार्यक्षेत्रात सामाजिक कामे करीत आहेत.सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या छावा क्रांतिवीर सेना या संघटनेला युवकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.नुकताच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मुंबई विभागातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण व भिवंडी या तालुक्यामधील शेकडो कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश घेतला. दि.१८ नोव्हेंबर रोजी झालेल्या या प्रवेश सोहळ्यात शहापूर तालुक्यातील संघटनेच्या नवीन पदाधिकारी यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला.

या प्रसंगी ठाणे जिल्ह्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटनेमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त करूत जाहीर प्रवेश केला.या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करतांना संघटनेचे संस्थापक करण भाऊ गायकर यांनी संघटनेची ध्येय-धोरणे याबाबद्दल माहिती दिली. तसेच संघटनेचे आजवरचे काम कशा पद्धतीनचे आहे,युवकांनी या संघटनेत काम करतांना सामाजिक, शैक्षणिक,शेतकरी, कामगार या क्षेत्रात होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडणे आणि अन्यायग्रस्तांना न्याय मिळवुन देणे, यासाठी काम करणे गरजेचे आहे, असे सर्वांना मार्गदर्शन केले.तसेच आपल्यावर जबाबदारी टाकलेली आहे .ती प्रामाणिकपणे पार पाडत आपली संघटना गाव व शहर पातळीवर मजबूत करण्यासाठी सामाजिक कार्यातून जे करता येईल. ते करावे.येणाऱ्या काळामध्ये नवंनियुक्त पदाधिकाऱ्यांनी चांगले काम करत असतांना संघटनेचे कुठेही नाव खराब होणार नाही याचीही जाणीव ठेवावी.जिथे अन्याय अत्याचार होत असेल तिथे छावा नावाचं वादळ मदतीला असेल.अशा प्रेरणादायी शब्दात मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे मुंबई कोकण अध्यक्ष चंद्रशेखर विसे यांनी केले.तर आभार संघटेनेचे प्रदेश महासचिव शिवाजी मोरे यांनी मानले.या प्रवेश सोहळ्याप्रसंगी संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नवनीत महाराज गोरले,युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे, कामगार आघाडी प्रदेशाध्यक्ष किरण डोके, वैद्यकीय आरोग्य आघाडी प्रदेशाध्यक्ष शांताराम गायकवाड,विकास काळे, वैभव दळवी, ठाणे जिल्हाध्यक्ष नरेश पष्टे ,बळीराम गोरे यांच्या सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी खालील नियुक्त्या देण्यात आल्या त्यामध्ये मुंबई-कोकण कार्याध्यक्षपदी श्याम लक्ष्मण भाकरे ,भिवंडी तालुकाध्यक्षपदी निवृत्ती रामचंद्र पाटील, कल्याण तालुकाध्यक्षपदी अनिल बोंबे, कल्याण युवक तालुका अध्यक्ष सतीश भोईर, शाखा प्रमुख राहुल पाटील यांच्या निवड करण्यात आलेल्या आहेत.

बातम्या

Don`t copy text!