मराठा आरक्षणास ओबीसी समाजाचा पाठिंबा

ओबीसी समाज बांधवाची महत्वाची बैठक संपन्न

नाशिक मिरर वेबटीम :  मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे परंतु मराठा समाजाला आरक्षण देते वेळी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये. मराठा समाजाला आरक्षण साठी ओबीसी समाजाचा संपुर्ण पाठिंबा आहे. येणाऱ्या काळात ओ.बी.सी समाजाच्या आरक्षणा संदर्भात कृती समिती व समता परिषद तर्फे महाराष्ट्र भर आंदोलने करण्यात येणार आहेत. असे बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला आहे.सातपुर परिसरातील ओबीसी समाज बांधव आरक्षण बचाव कृती समितीची बैठक श्रमिक नगर येथे संपन्न झाली.अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नाशिक शहर व आरक्षण बचाव कृती समितिची बैठक पालकमंत्री आदरणीय छगनराव भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सातपुर मधील विभागीय बैठक दि.२१ नोव्हेंबर संपन्न झाली.सदर बैठकीचे आयोजन ओबिसी बचाव कृती समिती व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तर्फे करण्यात आली होती . यावेळी योगेश कमोद, मा.नगरसेवक सदाशिव माळी, समाधान जेजुरकर, श्रीराम मंडळ, हर्षल सोनवणे, जिवन अहिरे,प्रकाश महाजन,गोविंद माळी,मच्छींद्र माळी,भारत जाधव,किरण भिवसने, आण्णा साहेब जावळे,अनिल माळी,दिपक चव्हाण,सुनिल देवरे,हनुमान सोनवणे,अमोल महाजन,रविंद्र महाजन, गुलाब माळी,कविश्वर पाटील,ज्ञानेश्वर महाजन,संजय महाजन, गोरख गांगुर्डे, सावता सैंदाणे ओ.बी.सी.बांधव व समता सैनिक उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!