दि.१४ आणि १५ डिसेंबरला मुंबईनगरीत मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन ; नाशिक जिल्ह्यातून हजारो समाज बांधव उपस्थित राहणार
मराठा क्रांती मोर्चा विशेष
नाशिक मिरर वेबटीम : मराठा क्रांती मोर्चाच्या दि.१० डिसेंबर रोजी झालेल्या झूम मिटिंग मध्ये उपस्थित असलेल्या राज्यभरातील १०० पेक्षा अधिक मराठा समन्वयकांनी सर्वानुमते घेतलेल्या निर्णया नुसार मराठा आरक्षणा संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील खटला लक्षात घेऊन चर्चा करण्यात आली. या आधी ठरल्या प्रमाणे १ व २ तारखेला राज्यात ठिकठिकाणी SEBC उमेदवारांच्या नियुक्तीसाठी महावितरण कार्यालया समोर आंदोलन केले होते.कोविडच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहन मोर्चास प्रतिबंध घातला आहे, त्यामुळे छावा क्रांतिवीर सेना व मराठा क्रांती मोर्चा नाशिक च्या वतीने आयोजित करण्यात आलेला वाहन मोर्चा रद्द केला असल्याचे संस्थापक अध्यक्ष व मराठा क्रांती मोर्चा समिती समन्वयक करण गायकर यांनी सांगितले . यापुढे अधिक ताकदीने सर्वोच्च न्यायालयातील व आंदोलनांचा लढा पुढे न्यावा लागणार असून
आझाद मैदान येथे दि.१३ व १४ डिसेंबर रोजी मराठा आरक्षण स्थगिती आदेशाच्या अगोदरचे नियुक्तीच्या प्रतीक्षेत असले २ हजार १८५ उमेदवार ज्यामध्ये तलाठी, मेट्रो, राज्यसेवा महावितरण SEBC मराठा उमेदवार उपोषण करणार आहेत.
या उमेदवारांचा नियुक्तीचा प्रश्न, तसेच सदरील उमेदवारांना तात्काळ नियुक्ती द्यावी त्यांना वगळून तलाठी,मेट्रो,महावितरण मध्ये नियुक्ती देण्याचा घाट राज्यसरकारने घातला आहे. विधिमंडळातील आमदारांनी सदरचे प्रश्न अधिवेशनात उपस्थित करून सोडवावेत असे अवाहन सकल मराठा समाज-मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहे.त्याचबरोबर ज्यांना शक्य आहे त्यांनी, आझाद मैदान येथे आंदोलक मराठा विद्यर्थ्यांना पाठिंब्यासाठी भेट द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
२५ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. तो पर्यंत मराठा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन पुढील आंदोलनाच्या जनजागृती साठी व न्यायालयीन लढ्यात देखील सर्वानी सहभागी होऊन, व आपापल्या परीने योगदान द्यावे असे आवाहन गायकर यांनी केले आहे.हे प्रश्न सुटले नाही तर पुन्हा पुन्हा छोटी छोटी आंदोलने करण्यापेक्षा पुन्हा एकदा मोठ्या ताकतीने समाजाला संघटित करून आंदोलनाची धार आणखी तीव्र करण्यासाठी सर्वांनी आगामी आंदोलन व्यापक व अभूतपूर्व करावे लागेल. हिवाळी अधिवेशनामध्ये SEBC प्रवर्गातून उत्तीर्ण २ हजार १८५ तलाठी, मेट्रो, राज्यसेवा महावितरण पात्र विद्यार्थ्यांचा नियुक्तीचा प्रश्न सुटत नसेल तर सर्व आमदारांनी अधिवेशनात आक्रमक भूमिका घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील आमदारांशी संपर्क साधावा यासाठी नाशिक मराठा क्रांती मोर्चा प्रत्येक आमदाराला निवेदन देणार आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव या ठिया आंदोलनासाठी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. यासंदर्भात आज पूर्व नियोजनाबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नाशिक जिल्ह्याची बैठक घेण्यात आली. या बैठकीस मराठा क्रांती मोर्चा चे राज्य समन्वयक करण गायकर, तुषार जगताप,राजू देसले, उमेश शिंदे, आशिष हिरे, संजय सोमासे, पुंडलिक बोडके, संजय फडोळ, माधवी पाटील, बाळासाहेब लांबे, बंटी भागवत, चेतन शेलार, अमित जाधव,अस्मिता देशमाने, पूजा धुमाळ, विकास कानमहाले, विठ्ठल राजे भोसले, सचिन पवार, विजय खर्जुल, वैभव दळवी, सुनील भोर, प्रदीप पगार, हरिभाऊ बोडके आदी मराठा समाज बांधव उपस्थित होते.
