दि.३१ नवी दिल्ली नाशिक मिरर: देशातील 4 राज्यांमध्ये (coronavirus) कोरोना व्हायरसचं यशस्वी ड्राय रन अर्थात रंगीत तालीम घेतल्यानंतर आता देशभरात केंद्र सरकार असाच उपक्रम हाती घेण्याच्या तयारीत आहे. यासाठीची योजना आखण्यासही सुरुवात झाल्याचं कळत आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम हाती घेण्याचं कारण म्हणजे जेव्हा मोठ्या स्तरावर लसीकरणाथच प्रक्रिया मुळ स्वरुपात सुरु होईल त्यावेळी कोणतीही अडचण येऊ नये.
सर्व राज्यांच्या राजधानीमध्ये कमीत कमी तीन सेशन साईटवर याची आखणी करण्यात येणार आहे. अतिशय दूरवरच्या भागात असणाऱ्या राज्यांचाही या ड्राय रनमध्ये समावेश असेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार यासंबंधी सर्व राज्यांच्या प्रतिनिधींशी बैठक घेण्यात आली आहे. आम्ही राज्यांमध्ये कमीत कमी दोन अशी ठिकाणं पाहात आहोत, जिथं पुरेशा लाभार्थींना नामांकित केलं जाईल, असं ते म्हणाले. २ जानेवारीपासून अतिशय मोठ्या स्तरावर देश कोरोना लसीकरणाच्या उपक्रमात महत्त्वाचं पाऊल टाकणार आहे.
