नाशिक मिरर :
सातपूर परिसरात कोविड बाधित रुग्णांची होणारी परवड पहाता सर्व सोयीने युक्त कोविड बाधित रुग्णांवर उपचार व्हावे यासाठी सातपूर मधील सर्वपक्षीय नगरसेवकांनी संघटीत होत आणि पक्षाचे झेंडे बाजुला ठेवून व सर्वच सामाजिक कार्यकर्ते कोरोना बाधित रुग्णांना मदत करण्यासाठी एकवटले आहेत. कोविड बाधितांसाठी सातपूर मध्ये कोविड सेंटर असावे यासाठी प्रसार माध्यमातून आवाज उठवला होतो. त्याला प्रतिसाद देत गेल्या रविवारी स्थानिक लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक झाली.व सर्वानी सकारात्मक प्रतिसाद दिला.आणि आयसोलेशन सेंटर साठी मदतीचा ओघ सुरु झाला.
त्र्यंबकरोड येथील पपया नर्सरी सिग्नल वर रेशीमगाठी लॉन्स व मंगल कार्यालयाची प्रशस्त जागा उपलब्ध करून आणि ५० बेड देवून नगरसेवक सलिम शेख यांनीआपली सामाजिक बांधिलकी जोपासली.
नगरसेविका इंदुबाई नागरे,शशी जाधव,विक्रम नागरे यांच्या पुढाकाराने ७० बेड आलेत.आणि मदतीचा ओघ सुरु झाला.कोणी रोख स्वरूपात तर कोणी वस्तुच्या स्वरुपात,तर जवाबदारीच्या स्वरूपात सर्व प्रकारच्या मदतीचे अनेक हात पुढे आल्याने लवकरच आयसोलेशन सेंटर सुरु होईल.त्यामुळे बाधित रुग्णाना व त्यांच्या नातेवाईक यांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी रेशीमगाठी मंगल कार्यालयाला भेट दिली व शासनाकडून सर्व प्रकारची मदत आणि सहकार्याची ग्वाही भेटी दरम्यान दिली.
काही सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेत कोविड रुग्णांना दोन वेळेचा चहा,सकाळचा नाश्ता , दोन वेळचे पौष्टीक जेवण देण्याची सोय केली असल्याचे यावेळी सांगितले. आयसोलेशन सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेत रुग्णांसाठी योगा,खेळाची सुविधा,पुरुषासाठी तळमजल्यावर ७० बेड व महिलांसाठी वरच्या मजल्यावर स्वतंत्रपणे ५० बेडची सुविधा करण्यात आली असल्याचे नगरसेवक सलिम शेख यांनी सांगितले. सातपूर सारख्या कामगार वसाहतीत वन रुम किचनचा छोट्याशा घरामध्ये कोविड बाधित रुग्णांची गैरसोय होत होती. त्यांची जागेची अडचण पहाता माणुसकीच्या दृष्टीने रुग्णांच्या सोयीसाठी आयसोलेशन सेंटरची उभारण्याची संकल्पना सुचली आणि सर्व सहकारी लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांमुळे ती पुर्णत्वास नेली असल्याचे सलिम शेख यांनी अभिमानाने सांगितले.
आयसोलेशन उभारणीसाठी नगरसेवक सलिम शेख,
शशी जाधव,योगेश शेवरे,भागवत आरोटे,नगरसेविका हेमलता कांडेकर,इंदुबाई सुदाम नागरे,सामाजिक कार्यकर्ते विक्रम नागरे,संजय जाधव, नितीन निगळ,दीपक मौले, लखन कुमावत,अभिजित शिंदे, बाळासाहेब भोजने, डाॅ.अमोल वाजे, संदीप सोनवणे,सचिन सिन्हा,ज्ञानेश्वर निगळ,बाबाजी जाधव,कमलेश तोरवणे, प्रमोद पाटील यासह अनेकांचे सहकार्य लाभले.
