मुंबई, दि. 26 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ निवेदक दीपक वेलणकर यांनी ही मुलाखत घेतली आहे. रविवार, दि. 27 फेब्रुवारी 2022  रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यूट्यूब- https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR 

मराठी  भाषा गौरव  दिनानिमित्त ही विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत सुरू असलेले प्रयत्न, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित करण्यात येणारे विविध उपक्रम, अमराठी लोकांना मराठी आपलीशी वाटावी यासाठी करण्यात येणारे प्रयत्न, मराठी भाषेच्या धोरणाची अंमलबजावणी, मराठी भाषा विभागाच्या अधिपत्याखालील विविध कार्यालये करीत असलेली कामे आदी विषयांची माहिती, मंत्री श्री. देसाई यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.

Don`t copy text!