भारतीय रेल्वे देशभरातील गाड्यांचे वेळापत्रक बदलणार आहे. यापूर्वी 1 ऑक्टोबरपासून गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात येणार होते, परंतु काही कारणांमुळे 31 ऑक्टोबर रोजी ते अंतिम करण्यात आले. या तारखेनंतर म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून नवीन वेळापत्रक लागू केले जाईल. यानंतर 13 हजार प्रवासी गाड्यांच्या वेळा बदलतील. 1 नोव्हेंबरपासून देशात चालणार्या जवळपास 30 राजधानी गाड्यांची वेळही बदलणार आहे.
तेजस एक्सप्रेस चंदीगड ते नवी दिल्लीदरम्यान धावणार
तेजस एक्स्प्रेस 1 नोव्हेंबरवगळता प्रत्येक बुधवारी चंदीगड ते नवी दिल्लीकडे धावेल. ट्रेन क्रमांक 22425 नवी दिल्ली-चंदीगड तेजस एक्सप्रेस दर सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवारी रविवारी सकाळी 9.40 वाजता नवी दिल्ली रेल्वे स्थानकातून सुटेल आणि चंदीगड रेल्वे स्थानकात दुपारी 12.40 वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे 22426 चंदीगड – नवी दिल्ली तेजस एक्स्प्रेस देखील चंदीगड रेल्वे स्थानकातून त्याच दिवशी दुपारी 2.35 वाजता धावेल आणि सायंकाळी 5.30 वाजता नवी दिल्ली रेल्वे स्थानकात पोहोचेल.
