नाशिक मिरर : म्हसरूळ प्रतिनिधी
अक्षांश रेखांशनुसार मोबाईलवर अचूक हवामान अलर्ट व हवामान माहिती देणाऱ्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि मशीन लर्निग (एमएल) असिस्टेड रियलटाईम ( घटना घडत असतांना माहिती देवाणघेवाण) कस्टमाईज वेदर इन्फॉर्मेशन सिस्टीम’ची गरज आहे. यासाठी ‘अंदाज नव्हे माहिती!’ या नावाची यंत्रणा नाशिकसह देश पातळीवर उभारण्यासाठी कार्यशील आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी दिली.
भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांना सकारात्मक विचार देत उभारी देण्यासाठी व शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी अकाउंटिबिलीटी (उत्तरदायित्व) आणि रिस्पॉन्सिबिलिटी (जबाबदारी) घेत हवामान माहिती भारतातील शेतकऱ्यांसह १ अब्ज ३९ कोटी जनतेपर्यंत पोहोचविणे आवश्यक व शक्य आहे.
विनाअनुदानित व विनामोबदला राष्ट्रीय पातळीवर चालविली जाणारी ही सेवा यंत्रणा आहे. यात इच्छुकांनी योगदान देण्यासाठी संपर्क साधला तरी हरकत नाही, अशी माहिती ‘अंदाज नव्हे माहिती!’ या हवामान अलर्ट व हवामान माहिती सेवेचे प्रणेते तसेच पुणे येथील भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटियरोलाॅजी (आयआयटीएम) चे माजी शास्त्रज्ञ प्रा. जोहरे यांनी ‘नाशिक मिरर’ला विशेष मुलाखतीत दिली.
४ ऑक्टोबर २०१० साली पाषाण (पुणे) येथील ढगफुटी म्हणजे ९० मिनिटात १८२ मिलीमीटर झालेला पाऊस होण्याआधीच सांगितला होता. प्रा. जोहरे यांनी हवामानाचा अचूक वेध घेणारी बनविलेली उपकरणे आजही पृथ्वीच्या दक्षिणध्रुव म्हणजे अंटार्टिका आणि उत्तर ध्रुव म्हणजे आर्टिक्टवर कार्यक्षम आहेत. मान्सून, चक्रीवादळ, विजा, गारा, ढगफुटी, महापूर, दुष्काळ आदी हवामानविषयक माहिती तातडीने देत पिकनियोजनाने कोट्यावधी रुपयांचा आर्थिक फायदा त्यांनी हजारो शेतकऱ्यांना करून दिली आहे.
‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि मशीन लर्निग (एमएल) असिस्टेड रियलटाईम कस्टमाईज वेदर इन्फॉर्मेशन सिस्टीम’ उभारणीसाठी लागणारा निधीत नागरिक व शेतकरी स्वतः चा फायदा समजून घेत सेवाभावी वृत्तीने योगदान करू शकतात. रियल टाईम याचा अर्थ म्हणजे घटना घडत असतांना माहिती देवाणघेवाण होय.
अंदाज नव्हे तर हवामानाची माहिती शेतीद्वारे निर्यात वाढवत भारतीय अर्थव्यवस्थेत ४०० टक्क्यांपर्यंत जीडीपी वाढ शक्य आहे. म्हणूनच हवामान शास्त्रज्ञ देशाचे खरे ‘भाग्यविधाते’ आहेत असेही प्रा. जोहरे म्हणाले.
सध्या प्रा. जोहरे हे पुणे विद्यापीठात डॉ. ए. डी. शालिग्राम व के. व्ही एन. नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. जी. वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांच्या सहाय्याने ॲटोमेशन विषयी पीएचडी करीत आहेत. नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सायखेडा (नाशिक) वरीष्ठ महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक सायन्स विभागाचे विभागप्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत. मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सरचिटणीस निलिमाताई पवार व संचालक मंडळ, शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे व डॉ. एन. एस. पाटील, सायखेडा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. एस. घुमरे, केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, सटाणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर आदींचे तसेच आपल्या सर्व सहकार्यांचे नेहमीच प्रोत्साहन व सहकार्य लाभते, असा उल्लेख प्रा. जोहरे आवर्जून करतात.
लेखक – प्रा. किरणकुमार जोहरे
(भौतिकशास्त्रज्ञ व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ढगफुटी व हवामान तज्ज्ञ)
अधिक माहिती व आपत्कालीन संपर्कासाठी :
प्रा. किरणकुमार जोहरे
kkjohare@rediffmail.com
9168981939 whatsapp (please do not call or whats app. if urgent then please sms)
Facebook Page : अंदाज नव्हे माहिती
Twitter: @kirankumarjohar
Facebook Id: Kirankumar Kiku
Instagram: Kirankumar Johare
YouTube: Prof Kirankumar Johare
www.kirankumarjohare.org
***
