नाशिक मिरर : आकाशवाणी भाजी मार्केट मध्ये भाजी घेण्यास गेलेल्या महिलेस सोन्याचे मंगळसूत्र सापडले सदर महिलेने गंगापुर पोलीस ठाण्यास संपर्क करून सदर चैन परत करून एक आदर्श महिला समोर उभा केला आहे. कल्पना नारायण न्याहाळदे, (वय – ४३, व्यवसाय गृहीनी, रा. प्लॅट नं. ४०२, सिध्दी पुजा ग्लोरी अपार्टमेंट गंगापुर रोड) या दि.२३ रोजी सकाळी आकाशवाणी भाजी मार्केट येथे भाजीपाला घेण्याकरीता गेल्या असता सदर महिलेस एक सोन्याचे मंगळसुत्र खाली पडलेली मिळुन आल्याने सदर महिला कल्पना न्याहाळदे यांनी त्यांचे पती नारायण सखाराम व्याहाळदे (पोलीस निरीक्षक,शिर्डी) यांना याबाबत फोनद्वारे सांगितले.
महिलेचे पती नारायण सखाराम न्याहाळदे यांनी सदरची सोन्याची चैन घेवून गंगापुर पोलीस ठाणे, नाशिक शहर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांच्या सोबत संपर्क करून सदर महिलेने सोन्याची चैन सुखरूप पोलीस ठाण्यात आणून दिली. सदर महिलेने चांगले काम करून एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे.त्याबद्दल वरीष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख पोलीस विभागाच्या वतीने सदर महिलेस पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
