नाशिक मिरर वृत्तसेवा : सातपूरला महिंद्रा सर्कल येथे आयशर च्या मागील टायर खाली सापडून अपघातात ४२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सविस्तर माहिती अशी की, शनिवार दि. २५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास मालवाहतूक आयशर एम.एच १४ के.ए ४८८५ सातपूर औद्योगिक वसाहती मधून महिंद्रा सर्कल वरून अंबड लिंक कडे जात असताना हिरो होंडा दुचाकी क्र एम. एच१५ एएक्स ८९८१ या दुचाकी वरून आपल्या घरी पती किरण राजगुरू सोबत पत्नी सुनीता किरण राजगुरू रा. सातपूर कॉलनी वय ४२ या जात होत्या. आयसर ने महिंद्रा सर्कल वर दुचाकी कट मारला या मध्ये दुचाकी आयशर मागील चाकाखाली दाबली गेली. यामध्ये पत्नी सुनीता राजगुरू यांचा जागीच मृत्यू झाला. तर पती किरण हे गंभीर रित्या जखमी झाले आहेत.
त्र्यंबकेश्वर ची जत्रा असल्याकारणाने सातपूर त्र्यंबक रोडवर वाहनांची मोठी गर्दी होती. सातपूर कॉलनीत भाडेतत्त्वावर राहणाऱ्या या महिलेचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. यावेळी सातपूर पोलिसांना या अपघाताची माहिती समजताच सातपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. व त्यांनी अधिक माहिती जाणून घेऊन ड्रायव्हर व आयसर गाडी ताब्यात घेतले आहे.अपघात कसा घडला याचा तपास सातपूर पोलीस करीत आहे.सदर सर्कल वरील सिग्नल व्यवस्था प्रशासनाने केली आहे ती पूर्णपणे चुकीची असून, सर्कल अरुंद करून रस्ता रुंद करण्याची मागणी यावेळी सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके, राहुल साळुंखे यांनी केली आहे.
