सातपूर : नाशिक मिरर वेबटीम सातपूर गांवातील कमान ते छत्रपती शिवाजी मंडई पर्यंतच्या रस्त्यावर व बाहेर मोठ्या प्रमाणात भाजीविक्रेते ,फळविक्रेते, किरकोळ कटलरी व इतर व्यवसायिक यांनी अतिक्रमण करून रस्ता ब्लॉक केला होतो. विक्रेत्यांचे अतिक्रमणचा अनेक वर्षापासून असलेला प्रलंबित प्रश्न सातपूर चे विभागीय विभागीय आधिकार व अतिक्रमण अधिकारी यांनी सोडवला. नवनियुक्त नवीन विभागीय अधिकारी नितीन नेर यांनी दिवाळी नंतर संपूर्ण अतिक्रमण काढले जाईल असे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते.
   दरम्यान  ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करुन  दिलेला शब्द पाळला. म्हणून सातपूर गावातील ग्रामस्थांच्या वतीने विभागीय अधिकारी नितीन नेर यांचा सत्कार करण्यात आला.
   (वरील छायाचित्र प्रमाने अतिक्रमण केले जात होते)     रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून विविध प्रकारचे बैठे विक्रेते भाजीपाला,फळ विक्रेते, खेळणी विक्रेत्यांमुळे या मार्गावरून मळे परिसरात व गावात जाणाऱ्या- येणाऱ्या लहान मोठ्या वहानांचा रस्ता बंद झाला होता.तसेच येथील मेन रोड वरील अधिकृत पणे व्यवसाय करणारे व्यवसायीक यांची या अतिक्रमण मुळे रोजची डोकेदुखी ठरत होती.त्यामुळे सातपूर मेन रोड अतिक्रमण प्रश्न विभागीय अधिकारी नितीन नेर यांनी निकाली काढल्याबद्दल त्यांचे सातपूर ग्रामस्थांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले यावेळी पुष्पगुच्छ देऊन नितीन नेर  यांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले.तर तानाजी निगळ यांचे देखील ग्रामस्थांनी कौतुक केले.
यावेळी शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ ,  तर सातपूर विभाग प्रमुख शिवसेना योगेश गांगुर्डे ,सातपूर प्रभाग समिती सदस्य विजय भंदुरे, शांताराम निगळ, प्रकाश निगळ ,आशोक आहेर ,छगन भदूरे, किशोर मुदडा, त्रबक भंदूरे,सदेश पगारे, आदी नागरिक, ग्रामस्थ  उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!