फायनान्स कंपनीच्या वसुलीच्या दबावमुळे केली आत्महत्या

सातपुर : नाशिक मिरर वेबटीम

सातपुर कॉलनी येथील श्रीकृष्णनगरातील मोबाईल व्यावसायिक योगेश उर्फ हनुमंत जाधव वय (४२) याने काल पहाटे घरातील छताच्या पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी असा परिवार आहे.सातपूर पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.दरम्यान मयत जाधव यांना वित्तीय संस्था ,फायनान्स कंपनी चे लॉन घेतले होते .वसुली चे लोक वारंवार मोबाईल वरून व प्रत्यक्ष येऊन वसुलीसाठी धमकी देत असत, अशी प्राथमिक माहीती नातेवाईकांनी दिली.आमहत्या मागील खरे कारण अजून स्पष्ट झाले नसून सातपूर पोलीस स्टेशन अधिक तपास करीत आहे.

बातम्या

Don`t copy text!