ईदच्या सणात राजकीय भेद विसरले; सातपूरमध्ये एकत्र दिसले आजी-माजी नगरसेवक
नाशिक मिरर वृत्तसेवा :
सातपूर परिसरात पवित्र रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. ईदनिमित्त विविध मशिदींमध्ये सकाळी नमाज पठण करण्यात आले असून मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
सातपूर येथील रजविया मशिदीत ईदची विशेष नमाज अदा करण्यात आली. या नमाज पठणाचे नेतृत्व मौलाना मुफ्ती असिफ रजा यांनी केले. नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्या आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले.
शिवाजीनगर, अंबड लिंक रोड, अशोकनगर, गंगापूर गाव आणि आनंदवली परिसरातील मशिदींमध्येही सकाळी नमाज पठण करण्यात आले. सर्वत्र उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.
या प्रसंगी माजी नगरसेवक सलीम शेख, फारूक भाई पठाण, नगरसेवक नितीन निगळ, नगरसेविका सविता काळे, माजी नगरसेविका दिक्षा लोंढे, तसेच सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काळे, भिवानंद काळे, अरुण काळे उपस्थित होते.
तसेच परिसरातील फारुकभाई पठाण, फैय्याज खान, हाशमत खान, यासर शेख, रूस्तम शेख, शरीफ शेख, ईरफान खान, निसार खान, जुनेद शेख, मोहसीन शेख, असलम शेख आदींसह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
दरम्यान, सणाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
एकूणच, सातपूर परिसरात रमजान ईदचा सण शांततेत, उत्साहात आणि बंधुभाव जपत साजरा करण्यात आला.
