दि. ७ डिसेंबर ते १४ डिसेंबर विविध भरगच्च कार्यक्रम चे आयोजन
सातपूर : नाशिक मिरर वेेेबटीम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र भूषण शरदचंद्र पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त सातपुर विभागात राष्ट्रवादी काँग्रेस व युवक काँग्रेस च्या वतीने विविध सामाजिक व आरोग्यदायी उपक्रमाचे आयोजन सातपूर मधील पदाधिकारी यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.दि.७ डिसेंबर ते १४ डिसेंबर मध्ये सदर कार्यक्रम घेण्यात आले. दि.७ डिसेंबर रोजी निबंध लेखन स्पर्धा अमित कोथमिरे व सचिन मंडलिक यांनी प्रभाग क्र.८ मध्ये, प्रभाग क्रमांक ८ मध्ये कल्पेश कांडेकर, महेश आहेर , यांनी तर प्रभाग १० मध्ये बाळासाहेब जाधव ,संदीप पवार प्रवीण नागरे यांनी प्रभाग ११ मध्ये नितीन निगळ, निलेश भंदुरे यांनी तर प्रभाग क्रमांक २६ मध्ये सुनिल पाटील ,लक्ष्मण निकम, गणेश नवले, राहुल निफाडे, पंकज भांबेरे यांनी निबंध स्पर्धा चे आयोजन केले होते.दि.१० रोजी रांगोळी स्पर्धा पुनम शहा यांनी आयोजन केले होते.दि.११ मोफत मधुमेह, थायरॉईड व हृदयरोग निदान शिबिर चे आयोजन डॉ.सुनील आंधळे, साई क्लीनिक म. हौ.कॉलनी येथे संपन्न झाले.दि.१३ रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर व नेत्ररोग निदान मार्गदर्शन, शनिमंदिर, शनिचौक, अशोकनगर येथे कल्पेश कांडेकर समाधान तिवडे, धनंजय रहाणे, अरुण भोसले, विश्वनाथ निकम, दत्तू वामन, किरण शिंदे, महेश जाधव, धनंजय खैरनार यांनी आयोजन केले आहे.दि.१४ डिसेंबर रोजी सातपूर परिसरातील कोविड महामारीमध्ये जीवाची पर्वा न करता सेवा देणारे डॉक्टर्स,पोलीस अधिकारी व कर्मचारी,इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी,शिक्षक,आशा कर्मचारी,मनपा सफाई कर्मचारी, रेशन दुकानदार,कोविड हॉस्पिटलमधील नर्स व वार्ड बॉय या सर्वांना “कोविड योद्धा” म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे.अशी माहिती नितीन निगळ अध्यक्ष रायुकाँ नाशिक पश्चिम, जिवन रायते अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातपूर विभाग,विकास सोनवणे सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातपुर विभाग,निलेश भंदुरे अध्यक्ष रायुकॉ, कल्पेश कांडेकर कार्याध्यक्ष यांनी दिली.
