नाशिक मिरर वेबटीम : त्रंबकरोड वरील महाराष्ट्र पोलीस अकादमी तील महिला कर्मचारी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार दि. १६ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण अजून समजलेले नसून या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल दिलबाग दुलगज ( वय १९ रा. एनसी ९) आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव असून त्याची आई अकादमीत सफाई कर्मचारी आहे. एनसी ९ या कर्मचारी वसाहती मधील आपल्या घरात राहूल ने अज्ञात कारणातून बुधवारी पहाटेच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली.तिच्या आत्महत्येचे कारण अजून समजले नसले तरी घराबाहेर जाता येत नसल्याने आलेल्या निराशेतून त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे असे बोलले जात आहे. गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी नऊ वाजता उघडकीस आली याबाबतची माहिती गंगापूर पोलिस ठाण्यातुन देण्यात आली आहे. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला होतो. राहुलचे बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले आहे.

बातम्या

Don`t copy text!