नाशिक मिरर वेबटीम : मुंबई-आग्रा महामार्गावर देवळा तालुक्यातील उमराणेजवळ ट्रक व तवेरा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले. इतर जखमी आहेत. देवळा पोलीस ठाण्यात मोटार अपघात दाखल करण्यात आला आहे. याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की , मंगळवारी दि 22 रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास उमराणे गावाजवळ मुंबई आग्रा महामार्गावर नाशिकच्या दिशेने जात असलेली तवेरा कार क्रमांक एम एच 15 सी एम 7712 हिने ट्रक क्रमांक एम एच 43 इ 1806 ला मागून जोरदार धडक दिली . या भीषण अपघात तवेरा मधील 3 जण जागीच ठार झाले तर तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत . मृत व्यक्तींवर मालेगांव येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे . मात्र अद्याप देवळा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आली नाही .

बातम्या

Don`t copy text!