आक्रमक आंदोलनच्या इशाऱ्या नंतर संस्थेच्या संचालक मंडळाने दिले तात्काळ निर्णयाचे लेखी आश्वासन
नाशिक मिरर वेबटीम : छावा क्रांतिवीर सेना या संघटनेने सारथी शिक्षण संस्थेतील उपोषणकर्ते तारादूतांना याआधीच पाठिंबा दिला होता.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी आज पुणे येथील सारथी कार्यालयाच्या समोर उपोषणास बसलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेत सारथी संस्थेतील प्रशासनाला धारेवर धरत जोरदार निदर्शने केली. व तारादूतांच्या न्यायिक मागण्यां संदर्भात तात्काळ लेखी आश्वासन द्यावे, अन्यथा राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल .असा इशारा दिल्यानंतर आजच सारथी शिक्षण संस्थेतील संचालक मंडळाची बैठक असल्याने आंदोलन चिघळून परिस्थिती हाताबाहेर जावु नये या करिता संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांची आंदोलक व उपोषणकर्ते यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.
व या सर्व संदर्भातील सविस्तर पत्र दिले.तब्बल सोळा दिवस कुंभकर्णा सारख्या निद्रिस्त अवस्थेत झोपलेल्या या प्रशासनाने पुढील कार्यवाही करीत तारादूतांबाबत तात्काळ निर्णयाचे लेखी आदेशाचे पत्र दिल्यानंतर उपोषणास बसलेल्या तारादूतांनी उपोषण मागे घेतले.छावा क्रांतीवीर सेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच या आंदोलनाला यश प्राप्त झाले. यावेळी प्रदेश महासचिव शिवाजी राजे मोरे, प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ, प्रदेश युवा सरचिटणीस नवनाथ शिंदे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाराम शिंदे, पुणे जिल्हा अध्यक्ष सागर भोसले, बिपीन दिवे, राजू फाले ,अनिता पैठण, पगार छाया, खैरनार इशा ,साळुंखे रवी ,सातपुते विजय ,जरे उमेश, दरपे वैभव,आदींसह यावेळी पदाधिकारी व तारादूत उपस्थित होते.
