नाशिक मिरर वेबटीम : निफाड
नाशिकच्या सिडको मधील रहिवाशी असलेल्या मंगला शंकर रणशिंगे या पुतण्याचे विवाहासाठी निफाड येथील रविराज मंगल कार्यालयात २४ डिसेंबर रोजी आलेल्या होत्या विवाहास वेळ असल्याने  नातेवाईकांकडे चहापाणी घेऊन रविराज मंगल कार्यालयाकडे दुपारी बारा वाजेच्या सुमारास उगांव रोडने ताथेड हाॅस्पिटल जवळुन संगमेश्वर  काँलनीच्या बोळाने इतर महिलांसोबत जात असतांना  समोरुन लाल काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी  मध्येच मोटारसायकल उभी केली पाठीमागे बसलेल्या इसमाने  मंगला रणशिंगे यांच्या गळ्यातील चैन असलेली एक सोन्याची पोत चार सोन्याचे मणी असलेली दोन मंगळसुत्रे ,एक सोन्याचा तीन पदरी शाही हार असे तीन लाख पाच हजार रुपयांचे दागिने ओरमडुन पलायन केले. इतर महिलांनी आरडाओरड करुन सतर्क केले तोपर्यंत मोटारसायकलस्वार दागदागिन्यांसह पसार झाले निफाड पोलिस स्टेशनला भादवि कलम 392 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Don`t copy text!