(स्वत:च्या रक्ताने बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र रेखाटुन जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करत नाशिक मनपा कामगार सेनेचे उपाध्यक्ष विजय गवारे यांचा सन 1992 ते 2021 पर्यंतचा 31 वा अनोखा उपक्रम )
नाशिक मिरर वेबटीम :
महाराष्ट्रातील हिंदुहृदयसम्राट शिवसेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नाशिक महानगर पालिका कामगार सेनेचे उपाध्यक्ष व नाशिक मनपा चे कर्मचारी विजय गवारे यांनी स्वत:च्या रक्ताचे चित्रकार प्रकाश अहिरे यांच्या कडून चित्र रेखाटत आहे. सन 1992 ते 2021 पासून एक कट्टर शिवसैनिक म्हणून अनोखा उपक्रम राबवत आहे.त्यांनी यातील चित्र बाळासाहेब हयात असतांनी त्यांना भेट देखील दिले होते.मी जिवंत असेपर्यंत हे कार्य करत राहणार असल्याचे विजय गवारे मोठ्या अभिमानाने सांगतात.
सन 1991 साली मुंबई येथे बाळासाहेब ठाकरे यांचे मानसपुत्र जयंत जाधव रा.प्रभादेवी मुंबई यांच्या माध्यमातून त्याकाळी शिवसेना प्रमुखांची भेट झाली.तेव्हापासून आजपर्यंत अखंडपणे शिवसेनेसाठी छोटे मोठे काम गवारे करत असतात.साहेबांनी मोठ्या आस्थेने अनेकदा विचारले कि,तुझी परिस्थिती कशी आहे ? पुढे कसे होइल ? असेही विजय गवारे हे सांगतात.
