नाशिक मिरर वेबटीम : सातपूर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी किशोर मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सातपूर पोलिस ठाण्याचे राकेश हांडे, यांची मुख्यालयात बदली झाल्याने नाशिक पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी त्यांच्या जागी किशोर मोरे यांची नियुक्ती केली आहे. मोरे यांनी नागपूर रेल्वे गुन्हे विभाग,गंगापूर वरीष्ठ पोलीस
निरीक्षक पदी कामकाज बघितले आहे. मोरे दि.२१ जानेवारी रोजी आपल्या कामाचा चार्ज स्वीकारला.पोलीस ठाणे च्या हद्दी मध्ये सातपूर औद्योगिक वसाहत असल्याने गुन्हेगार चे स्वरूप वेगळे असून सातपूर परिसरातून गुन्हेगार ,टवाळखोर यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे यावेळी वरीष्ठ पोलीस निरीक्षक मोरे यांनी यावेळी सांगितले.
