नाशिक मिरर वेबटीम :
सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून इमारतीस बसविलेले आगप्रतिबंधक उपाययोजना अग्निशमन यंत्रणा व विद्युत उपकरणे यांची आग लागल्या प्रसंगी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून हाताळता यावी, यासाठी आज दि.२२ रोजी सकाळी १० वाजता मनपाच्या अग्निशमन व विद्युत विभागाकडून सातपुरच्या विभागीय कार्यालयासमोर मनपा कार्यालयातील व मायको रुग्णालयातीलअधिकारी,कर्मचारी , शिपाई व सुरक्षारक्षक यांना सदर यंत्रणेची माहिती व जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून संयुक्तरित्या प्रशिक्षण देण्यात आले. याप्रसंगी सातपुर विभागीय अधिकारी नितीन नेर,अग्निशमन दलाचे लि.फायरमन पी बी.परदेशी,फायरमन एस.आर.जाधव,फायरमन ए.ए.पटेल,विद्युत विभागाचे उपअभियंता एस.व्ही.वायकर,इलेक्ट्रीशियन विलास गायकवाड तसेच मनपा कार्यालयातील व सातपुर कॉलनी व सातपुर मायको रुग्णालयातील अधिकारी,कर्मचारी व सुरक्षा रक्षक उपस्थित होते.
