शिवाजीनगर -श्रमिकनगर प्रभाग क्रमांक ९ मध्ये येणाऱ्या काळात शिवसेनेचा भगवा ध्वज फडकणार-विलास शिंदे मनपा गटनेते शिवसेना

नाशिक मिरर वेबटीम : हिंदूहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त प्रभाग क्रमांक ९ मध्ये सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.यामध्ये रक्तदान शिबिर,महिलांना साडी वाटप,ज्येष्ठ शिवसैनिक व नागरिकांचा भव्य नागरी सत्कार सोहळा यावेळी आयोजित करण्यात आला होतो.यावेळी बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रभाग क्रमांक ९ मधील शिवसैनिकांनी केले होते. कार्यक्रमाची सुरुवात मनपा गटनेते विलास शिंदे व छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या हस्ते छत्रपती शिवराय व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली व त्यानंतर प्रभागातील महिलांना साडी वाटप,रक्तदान करणार्‍या रक्तदात्यांना प्रमाणपत्र,ज्येष्ठ शिवसैनिक व नागरिकांचा सत्कार आदी कार्यक्रम पार पडले.यावेळी मार्गदर्शन करताना गटनेते विलास शिंदे म्हणाले की या भागांमध्ये शिवसैनिक अत्यंत तळमळीने काम करत प्रभागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत शिवसेनेचे विचार पोहोचवत आहे. शिवसेनेची विचारधारा ही ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या समीकरणावर चालते, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या भागातील कौटुंबिक मक्तेदारी संपवून शिवसेनेचा भगवा ध्वज हा शिवसैनिक फडकवतील याचा मला विश्वास आहे.या भागातील नागरिकांच्या मनावर शिवसेनेचे विचार प्रभाव करत करत असून येणाऱ्या काळात परिवर्तन हे निश्चित आहे सदर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या मतदारसंघात भगव वादळ निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.तसेच छावाचे संस्थापक करण गायकर बोलतांना म्हणाले की बाळासाहेब हे महाराष्ट्राला लाभलेलं एक क्रांतिकारी व्यक्तिमत्व आहे.
दडपशाही व अन्याया विरोधात आक्रमक पवित्रा असणे ही बाळासाहेबांची शिकवण आहे आणि याच्याच आधारावर प्रभागात परिवर्तन हे निश्चित असून त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रमोद जाधव,शिवा तेलंग,सौ.सविता गायकर,सौ.प्रियंका गायकर, साहेबराव जाधव,दिनकर कांडेकर,सागर जारे यांसह पीके जाधव,प्रकाश रोहम,किरण बडे, युवराज धात्रक,गोकुळ नागरे, नानासाहेब सावळे,महेश आहेर,सम्राट सिंग,नवनाथ शिंदे संजय कटारे,तुषार पाटील यांनी बाळासाहेबांच्या जीवनावर मार्गदर्शन केले.सदर जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी सचिन निकम,संतोष पवार,प्रवीण इंगोले,अविनाश गायकर,उमेश काळे,विनोद जाधव,अमोल शिंदे,प्रितेश पाटील,सचिन अहिरे सुमीत बच्छाव,राजू कदम, अनिकेत पवार,गोलू लोणकर, वैभव दळवी आदींनी परिश्रम घेतले. नवजीवन ब्लड बँक नाशिक यांच्या वतीने सपना नवले, मंगेश चित्ते, वर्षा तांबे, प्राजक्ता सोनभिरे ,चारुशीला गायकवाड, प्रीती गावित, किशोर साळुंके, यांनी ब्लड कॅम्प चे नियोजन केले.

बातम्या

Don`t copy text!