नाशिक मिरर वेबटीम : धुळे येथील पिंपळनेर शहरानजीक असलेल्या सामोडे गावातील संस्थाचालकाच्या घरावर सशस्त्र दरोडा पडल्याची घटना घडली असल्याची उघडकीस आले आहे. सात ते आठ दरोडेखोरांनी सुमारे ५० तोळे सोन्याचे दागिने लांबवले. या चोरटयांनी संस्थाचालक शिंदे व परीवाराला एका खोलीत बंद करुन हा प्रकार केला. साक्री तालुक्यातील पिंपळनेर नजीक सामोडे गावात सावित्रीबाई  फुले शिक्षण प्रसारक संस्था असुन या संस्थेच्या आवारात शरद दयाराम शिंदे व अनिल दयाराम शिंदे हे परीवारासह रहातात. आज पहाटेच्या सुमारास शिंदे यांच्या घराच्या मागील दरवाजा उघडुन अज्ञात सात ते आठ दरोडेखोरांनी प्रवेश करुन शिंदे यांना झोपेतुन उठवले. यानंतर चोरटयांनी घरातील सर्व सदस्यांना एकत्र करुन त्यांना धारदार शस्त्र व पिस्तुलाचा धाक दाखवला. ओरडल्यास जिवे ठार करण्याची धमकी देवुन सर्व सदस्यांकडुन मोबाईल काढुन घेउन सर्वांना एका खोलीत बंद करुन ठेवण्यात आले. त्यानंतर दोन तास या चोरटयांनी घरात धुडगुस घालुन कपाटातुन सुमारे ५० तोळे सोन्याचे दागिने तसेच तीन लाखाची रोकड काढुन घेतली. त्यानंतर चोरटयांनी घरातुन पोबारा केला. ब-याच वेळेनंतर घरात चोरटयांचा आवाज बंद झाल्याने शिंदे यांनी मदतीसाठी आवाज दिल्याने हा प्रकार उघडकीस आला. याघटनेची माहीती कळाल्याने पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत , अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव , उपविभागीय पोलिस अधिकारी मैराळे यांनी घटनास्थळी भेट देवुन चोरटयांचा माग काढण्यासाठी श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. यासंस्थेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असल्याने चोरटयांनी शिंदे यांच्या बंगल्यातुन मागील दारातुन प्रवेश करुन त्याच दारातुन पलायन केले. यावरुन चोरटयांना आवारात कॅमेरे बसवल्याची माहीती असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यासंदर्भात पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या

Don`t copy text!