महाराष्ट्रात कोरोना लस पोहोचली असून लसीकरणाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी येथील प्रशासनाने कंबर कसली आहे.
नाशिक मिरर वेबटीम : मुंबई केंद्र सरकारने भारत बायोटेक आणि सीरमच्या दोन कोरोना लसींना परवानगी दिल्यानंतर आता येत्या 16 जानेवारीपासून देशभरात लसीकरण सुरु केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून देशभरात 13 ठिकाणी लस पाठवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातही कोरोना लस पोहोचली असून लसीकरणाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी येथील प्रशासनाने कंबर कसली आहे. मुंबईत सकाळीच लस पोहोचली
पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून देशभरात 13 ठिकाणी लस पाठवण्यात आल्या आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला साठा आज (13 जानेवारी) सकाळीच मुंबईत दाखल झाला आहे. महानगरपालिकेच्या विशेष वाहनाने ही लस पुण्याहून मुंबईत आणण्यात आली. मुंबईत कांजूर येथील कोल्ड स्टोरेजमध्ये लस साठवली जाणार होती, मात्र या स्टोअरेज सेंटरचे काम अपूर्ण असल्याने लसीचा साठा परेलमधील एफ साऊथच्या पालिका कार्यालयात ठेवला आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट कडून सुमारे 1,39,500 डोस बृहन्मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाले आहेत.


नाशिक विभागात कोरोना लस पोहोचली : शालिमार येथील संदर्भ सेवा रुग्णालयात आज सकाळी कोरोना लस दाखल झाली आहे. लसीचे वितरण दुपारी १२ वाजेनंतर जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद आणि अन्य संस्थांकडे पुण्यात सर्वात मोठे कोल्ड स्टोरेज बनवण्यात आले आहे. त्यानंतर नियोजित केल्याप्रमाणे १६ केंद्रांवर लस १६ जानेवारीपूर्वी पाठवली जाणार आहे. एसओपीप्रमाणे सर्व तयारी पूर्ण झाली आहे, अशी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.नाशिक जिल्ह्यासाठी ४३ हजार ४४० लसी प्राप्त झाल्या आहेत. आरोग्य उपसंचालक आणि जिल्हाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात लसींचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे यांनी दिली.आज (13 जानेवारी) राज्यात कोरोना 8 उपसंचालक कार्यालयांमध्ये पोहोचत आहे. त्यानंतर येथून ही लस जिल्ह्याचे अधिकारी रेफ्रिजेटेड व्हॅनमधून घेऊन जातील. ही प्रक्रिया 14 जानेवारीपर्यंत पार पाडेल. सध्या नाशिक विभागात कोरोना लस पोहोचली आहे. नाशिक विभागााला एकूण 1 लाख 32 हजार कोव्हीड लसीचे डोस मिळाले आहेत. या विभागांतर्गत नाशिकसह एकूण पाच जिल्ह्यांमध्ये लसीचे वितरण होणार आहे. धुळे जिल्ह्याला 12430 डोस, जळगाव जिल्ह्याला 24320 डोस, नंदुरबार जिल्ह्याला 12410 डोस, तर नाशिक जिल्ह्याला 43,440 कोरोना लसीचे डोस मिळणार आहेत. सध्या अहमदनगर जिल्ह्याला 39290 कोरोना लसीचे डोस प्राप्त झाले आहेत.
औरंगाबादेत सकाळीच कोरोना लस दाखल : औरंगाबाद विभागाला मिळणाऱ्या कोरोना लसींचे डोसही आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात दाखल झाले आहेत. औरंगाबाद जिल्ह्याला लसीचे एकूण 64 हजार 500 डोसेस मिळाले आहेत. येथे सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. कित्येक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर कोरोना प्रतिबंधात्मक लस प्रत्यक्षात दाखल झाल्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जातेय.
कोल्हापूरला लस पोहोचली :
कोल्हापूर विभागीय कार्यलयांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात 2 हजार जणांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. येथील विभागीय कार्यालयातही लस पोहोचली आहे. कोल्हापुरात लसीकरणासाठी आरोग्य प्रशासनाकडून 20 आरोग्य केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये तालुका पातळीवर 12 ठिकाणांवर लसीकरण होईल. तर महापालिका कार्यक्षेत्रामध्ये 8 ठिकाणी 80 आरोग्य कर्मचारी कोरोना प्रतिंबधक लस देतील.

बातम्या

Don`t copy text!