नाशिक मिरर वेबटीम : धुळे जिल्ह्यातील खासगी बँकेच्या बँक व्यवस्थापकावर गोळीबार करुन त्याच्याकडील १ लाख ८७ हजार ५० रुपयांची रोकड अज्ञात दरोडेखोरांनी हिसकावुन नेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे धुळे शहरासह राज्यात एकच खळबळ उडाली असुन धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साक्री शहरातील रुपाई नगरात राहणारे तुकाराम सुभाष पाटील हा युवक फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेत साक्री शाखेत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे.या बँकेत तुकाराम पाटील यांच्यासह सहा जण कार्यरत असुन खासगी बँकेच्या माध्यमातुन बचत गटांना कर्जाचे वाटप केले जाते . या कर्जाच्या वसुलीचे काम बॅकेने पाटील यांच्याकडे देखिल सोपवले होते. त्यांच्याकडे धुळे तालुक्यातील नेर , अकलाड , मोराणे , भदाणे , खंडलाय , इच्छापुर , तामसवाडी , गंगापूर यांच्यासह २० गावातील वसुलीची जबाबदारी सोपण्यात आली होती. त्यानुसार पाटील हे मोटार सायकलीने वसुलीसाठी आले होते. काम आटोपल्यानंतर १ लाख ८७ हजार ५० रुपयांची रोकड घेवुन ते परत निघाले. त्यांची मोटारसायकल भदाणे फाटयाजवळ वेग कमी झाल्याचे पहाताच रस्त्याच्या कडेला खडडयामधे दबा धरुन बसलेला एक युवक , तोडाला लाल रंगाचा रुमाल बांधुन दुचाकीच्या समोर आला. त्याने पाटील यांच्याकडील बॅग हिसकावुन घेण्याचा प्रयत्न केला. पण पाटील बॅग सोडत नसल्याने त्याने गावठी पिस्तुलातुन पाटील यांच्या पायाच्या दिशेने गोळीबार केला. यात एक गोळी पाटील यांच्या पायाच्या बोटास लागल्याने ते जखमी झाले. ही संधी साधुन चोरटयाने बॅग घेवुन पलायन केले. यानंतर पाटील यांनी बँकेच्या अधिकारी व पोलिस ठाण्यास माहीती दिली. या घटनेनंतर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी या भागात शोध मोहीम राबवुन महामार्गावरील पेट्रोल पंप तसेच हॉटेलवरील कॅमेरे तपासत शोध मोहीमेला सुरुवात केली आहे. यासंदर्भात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या

Don`t copy text!