नाशिक मिरर वेबटीम : राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्याकडून कामगार उपायुक्त कार्यलयास प्राप्त झालेल्या पत्रानुसार शुक्रवार दि.१५ जानेवारी रोजी औद्योगिक वसाहती मधील कामगारांना ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान करण्याकरिता भरपगारी सुट्टी अथवा विशेष सवलत देण्याबाबत आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील ३४ जिल्ह्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे . त्यानुसार मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हे वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये शुक्रवार रोजी मतदान होणार आहे त्यानुसार नाशिक विभागातील जळगाव, धुळे,अहमदनगर, नंदुरबार,व नाशिक मधील सर्व जिल्ह्यांमध्ये दिनांक १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार आहे वरील कार्यक्रमांतर्गत सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. या ग्रामपंचायतसाठी नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी नागरी क्षेत्रामधील महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात लगत ग्रामपंचायत मधील मतदार नोकरीसाठी नागरी क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमाच्या अस्थापना, दुकाने,कार्यालये,औद्योगिक कारखाने , व्यापारासाठी शहरी भागात तात्पुरत्या स्वरूपात रहिवास अथवा ये-जा करीत असल्याने अशा मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी अथवा सवलत देण्यात यावी, ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात अथवा लगत महानगरपालिका अथवा नगरपालिका भागात औद्योगिक वसाहती असेल अशा आस्थापनानी कामगारांना रजा द्यावी. तसेच ज्या महानगरपालिका क्षेत्रात अथवा लगत ग्रामपंचायती नसेल अशा आस्थापना बंद ठेवण्याची आवश्यकता नाही.सदर आदेशाचे काटेकोर पणे पालन करून मतदाराना सुट्टी मिळाली नाही म्हणून मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचीत राहावे लागेल ,अशा आस्थापनावर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती नाशिक विभागाचे कामगार उपायुक्त गुलाबराव दाभाडे यांनी दिली आहे.

बातम्या

Don`t copy text!