नाशिक मिरर वेबटीम :  सातपूर त्र्यंबकरोड येथील दुधडेरी समोर नाशिक वरून सातपूर च्या दिशेने जाणाऱ्या कारने रस्त्यात अचानक पेट घेतला.काही जागरुक नागरिकांनी अग्निशामक दलाला कळविले असता,अग्निशामक दलाच्या जवानानी बंबाच्या सहाय्याने आग तात्काळ  विझविली.शिंगाडा तलाव येथील बब्बू शेख हे कार क्र.एम एच 02 बी वाय 5242 या सातपूरकडे जात असतांना कार मधून धुर येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.त्यांनी रस्त्यांवर थांबून ताबडतोब कारच्या बाहेर पडले.बघता बघता कारने क्षणार्धात इंजिनच्या बाजुने पेट घेतला. अग्निशमन दलाच्या वाहनचालक इक्बाल शेख,किशोर पाटील,अनिल गांगुर्डे,उदय शिर्के,व शरद देटके आदी कर्मचारी यांनी आग  विझविली.सदर घटना पाहण्यासाठी उपस्थित बघ्याच्या गर्दीने सुटकेचा निश्वास सोडला. या आगीत कार जळून खाक झाली.

बातम्या

Don`t copy text!