नाशिक मिरर वेबटीम : सातपूर मधील कामगार नगर येथे वास्तव्यास असलेले डॉ. नरेंद्र पाटील यांच्या राहत्या घरी बुधवार आज दि.१३ रोजी दुपारी १२ च्या सुमारास धाडसी घरफोडी करत ११ लाख रुपये रोख रक्कम सह एकूण ३ तोळे सोन्याचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार’ डॉ. पाटील यांच्या मधुमैत्री’ या बंगल्यात राहतात.दुपारी १२ वाजता डॉ.पाटील ओपीडी साठी बाहेर गेले होते. तर त्याची पत्नी देखील आई आजारी असल्याने भेटण्यास गेली होती.घरी कोणी नसतांना डॉ. नरेंद्र पाटील यांच्या दरवाजा चा आतले लॉक तोडून भर दुपारी १२ वाजेच्या दरम्यान ही घरफोडी झाल्याने कामगार नगरसह सातपूर परिसरात सदर घटनेची चर्चा होती.नागरिक देखील चोरीच्या घटना मध्ये वाढ झाल्याने धास्तावले आहेत. गोदरेज कपाटात ठेवलेली रोख रक्कम व सोनेसह तिजोरीच चोरट्यांनी लंपास केली आहे.डॉ. पाटील सायंकाळी ६ वाजता घरी आले तेव्हा सदर प्रकार उघडकीस आला. डॉ.पाटील यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरीष्ठ पोलिस निरीक्षक राकेश हांडे अधिक तपास करत आहे.सातपूर परिसरात भर दिवसा घरफोडीचे हा दुसरा प्रकार आहे. पोलिसांनी गस्त वाढवून घरफोडीच्या घटनांवर नियंत्रण ठेवावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रामहरी संभेराव यांनी केली आहे.
