पाच पुरुषांसह एका महिलेस शहर पोलिसांनी अटक केली असून एका अल्पवयीन संशयित ताब्यात

नाशिक मिरर वेबटीम :
चाकुचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याची खळबळजनक व माणुसकीला काळीमा भासणारी घटना नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पाच पुरुषांसह एका महिलेस शहर पोलिसांनी अटक केली असून एका अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले आहे.नाशिकरोड येथील अरिंगळे मळा परिसरात ही घटना घडली. पीडितेस संशयितांनी दोन दिवसांपूर्वी चाकूचा धाक दाखवून अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर शनिवारी (दि.९) पुन्हा संशयितांनी पीडितेस चाकूचा धाक दाखवून अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पीडितेने ही घटना आईला सांगितली. त्यानंतर आईने नाशिकरोड पोलीस ठाणे गाठून संशयितांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार नाशिकरोड पोलीस ठाण्यात पोक्सोसह सामुहिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करुन एका महिलेस पाच संशयितांना अटक केली तर एका अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले. अटक केलेल्या संशयितांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बातम्या

Don`t copy text!