नाशिक मिरर : नाशिक जिल्हा व शहरात कोरोना व्हायरस प्रभाव पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झाली आहे.रोज एक ते दीड हजार रुग्ण नव्याने पॉझिटिव्ह सापडत आहे.त्यामुळे नाशिकचे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात सकाळी ६ ते ७ दुकाने उघडे ठेवावी व शनिवार व रविवार या दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.सातपूर -अंबड औद्योगिक वसाहती मध्ये सदर आवाहनास सातपूर करांनी प्रतिसाद दिला असून दुकानदार व व्यापारी यांनी आपले व्यवसाय बंद ठेवले होते. शनिवारी औद्योगिक वसाहती ला सुट्टी असल्याने रस्तावर देखील शुकशुकाट होतो. यामधून औद्योगिक आस्थापनाना सूट देण्यात आली असून कंपनी मालक व व्यवस्थापनास सर्व नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे.सातपूर मधील सातपूर मधील मेनरोड, सातपूर गाव ,कामगार नगर, भाजीमंडई, सातपूर कॉलनी ,अशोकनगर ,
शिवाजीनगर, श्रमिकनगर मधील दुकाने बंद होते.

बातम्या

Don`t copy text!