न्याय मिळवण्यासाठी पीडित कुटुंबाचे सहा दिवसाचे उपोषण छावा क्रांतिवीर सेनेच्या मध्यस्थीने मागे
बोगस डॉक्टरचा दवाखाना तात्काळ सील करण्याचे आदेश
नाशिक मिरर : शासकीय जिल्हा रुग्णालयात संतोष ताराचंद कोरे यांच्या मुलाचा चुकीच्या पद्धतीने उपचार झाल्यामुळे मृत्यू झाला. त्या मुलाला न्याय मिळावा या करिता त्याचे आई-वडील गेल्या सहा दिवसांपासून शासकीय जिल्हा रुग्णालय नाशिक याठिकाणी उपोषणाला बसले होते.या प्रकरणातील सरकारी डॉक्टर स्वप्नील पाटील यांना स्वतः चा दवाखाना सुरु करण्याचा कुठलाही अधिकार नसताना त्यांनी बोगस दवाखाना सुरू करून त्या ठिकाणी त्यांची पत्नी ज्या डॉक्टर नसतांनाही त्यांनी स्वतःला डॉक्टर दाखवून कोरे यांच्या मुलावर औषोधोपचार केले, व चुकीचे उपचारांमुळे त्या मुलाची तब्येत आणखी खालावली म्हणून त्या मुलाला रुग्णवाहिकेद्वारे नाशिकला पाठविले. परंतु नाशिक ला आल्यानंतर अर्ध्या तासातच मुलाचा मृत्यू झाला.यानंतर मुलाच्या आई-वडिलांनी चौकशी केली असता स्वप्नील पाटील यांच्या पत्नी यांचा कुठलीही वैद्यकीय अभ्यास नसतांना चुकीचे उपचार केल्यामुळे त्यांचा मुलगा दगावला असल्याचे लक्षात आले.आपल्या मुलाला न्याय मिळावा याकरिता त्यांनी गेल्या चौदा महिन्यांपासून सर्व कागदपत्रे जमवली आणि सदर दोषी डॉक्टर व त्याच्या बोगस डॉक्टर पत्नीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच त्यांच्या खाजगी हॉस्पिटलला तात्काळ बंद करावे अशी मागणी केली.या मागणी करिता गेल्या सहा दिवसांपासून उपोषण सुरू होते परंतु कोणीही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही.
आज दि.२० मार्च रोजी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने त्या ठिकाणी जाऊन संबंधित प्रशासनातील अधिकरी व नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील सिव्हिल सर्जन यांना याबाबत जाब विचारला तसेच यात कशा पद्धतीने चुकीची कारवाई झालेली आहे हे लक्षात आणून दिले.
या पीडित कुटुंबाला न्याय द्यावा व त्या कुटुंबाला तात्काळ लेखी पत्र देऊन आपण जी काही कारवाई केलेली आहे, त्याची माहिती द्यावी नाहीतर या ठिकणी छावा, शिवसेना ,प्रहार संघटना ,स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिल्यानंतर तात्काळ प्रशासनाने लेखीपत्र काढत संबंधित डॉक्टरचा दवाखाना तात्काळ सील करावा असे आदेश दिले. व पुढील योग्य ती कारवाई करण्यासाठी रुग्णालय प्रशासन या कुटुंबाला सर्वस्वी मदत करेल असे आश्वासन लेखी पत्राद्वारे दिल्यानंतर या कुटुंबाचे सहा दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे घेण्याची विनंती त्या कुटुंबाला केली.त्या कुटुंबाचेही समाधान झाल्यामुळे त्यांनी हे उपोषण सोडले. या कुटुंबाला जोपर्यंत संपुर्ण न्याय मिळत नाही तोपर्यंत या कुटुंबाच्या पाठीशी छावा क्रांतिवीर सेना शिवसेना, प्रहार संघटना, भरभक्कम पणे उभे राहून या कुटुंबाला न्याय मिळवून देईल अशी ग्वाही संघटनेच्या वतीने देण्यात आली.
या प्रसंगी शिवसेना उपनेते माजी मंत्री बबनरावजी घोलप, छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक किशोर श्रीनिवास,उ.महा सपंर्कप्रमुख श्री.दत्तु बोडके,शिवसेना वैद्यकीय आघाडीचे योगेश म्हस्के, उद्योजक आघाडी प्रदेशाध्यक्ष किरण डोखे, महिला अध्यक्ष शोभा वरपे,सामाजिक कार्यकर्ते सागर आहेर, दीपक डोके
ललित डगळे,जिल्हा रुग्णालयाअधिकारी गहिनीनाथ जाधव यांसह अन्य नागरिक उपस्थित होते.

