नाशिक मिरर : सातपूर पोलीस स्टेशन हद्दीत १८ मार्च रोजी मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या दरम्यान बागलान मटन शॉप नाशिक येथील गोडाऊनला लावलेले लॉक अज्ञात इसमाने तोडून गोडाऊन मधील काळा तांबड्या व पांढऱ्या रंगाचे वेगवेगळ्या वजनाचे अंदाजे किंमत प्रत्येकी चार हजार रुपये किमतीचे असे एकूण २१ बोकड एकूण ८४ हजार रुपये किमतीचे अज्ञात इसमाने चोरून नेले होते.सदर बोकड चोरणाऱ्या आरोपींला मुद्देमाल सह मुंब्रा, ठाणे येथून अटक केले आहे. याबाबत सातपूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. गुन्ह्यतील अज्ञात आरोपी चा व चोरीला गेलेल्या मालाचा शोध घेन्यासाठी सातपूर पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत नागरे व पथकास माहिती देऊन शोध घेण्याबाबत आदेश दिले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागरे व आव्हाड, पोलीस कॉन्स्टेबल कासार ,आघाव यांनी सदर घटनेच्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सदरचा गुन्हा करते वेळी, आरोपींनी इनोव्हा कार वापरल्याचे दिसून आले व त्यापुढे बारकाईने निरीक्षण करत सदर इनेव्हा कारचा क्रमांक एम.एच 2 बी.जे २२४५ दिसून आला. तसेच सदर कार घोटी टोल नाका येथून मुंबईच्या दिशेने गेल्याचे येथीलसीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. तसेच सदर कार मालक व आरोपी भाईंदर ठाणे येथील असल्याची खात्री झाल्याने लागलीच पोलीस उपायुक्त परिमंडळ २ नाशिक शहर यांना माहिती देऊन त्याची लेखी परवानगी घेऊन भाईंदर ठाणे येथे जाऊन सदर गुन्ह्यातील संशयित आरोपीस कौशल्याने तांत्रिक विश्लेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक देसले, पोलीस शिपाई चंद्रकांत बागडे , रामनाथ पाटील, अमोल टर्ले, यांच्या मदतीने आरोपी चा मोबाईल नंबर ट्रेस करून त्यास ताब्यात घेण्यात आले. त्यास विचारपूस केली असता त्याने बागलाण मटन शॉप सातपूर नाशिक येथील गोडाऊन मधील बोकडे चोरल्याची कबुली दिल्याने त्याने चोरी केलेला माल जप्त करण्यात आलेला आहे. गुन्ह्यातील अटक केलेल्या आरोपीचे नाव आसिफ रशिद अल्लाह कुरेशी( वय ३५ वर्ष रा.स्टार गार्डन हॉल, मुंब्रा,ठाणे) असून एकूण १ लाख ९ हजार रुपये किंमती चे एकूण २६ बोकड जप्त करण्यात आले आहेत. गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राठोड हे करीत असून सदर आरोपीला गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. इतर साथीदारांचा अशाच प्रकारे कुठेकुठे गुन्हे केले आहेत याचा तपास सुरू आहे.
