नाशिक मिरर :
छावा क्रांतिवीर सेनेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे उदघाटन सोहळा व संघटनेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विजय जरे यांच्या ओम साई मेडिकल चा शुभारंभ सोहळा खा. युवराज छत्रपती संभाजीराजे व छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या उपस्थित संपन्न झाला.
या कार्यक्रम प्रसंगी युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, सर्वसामान्य जनता,शेतकरी,मराठा समाज,कामगार,महिला,विद्यार्थी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रात अग्रगण्य स्थानी असलेल्या छावा क्रांतिवीर सेनेच्या शाखेचे उदघाटन आज पिंपरी चिंचवड या ठिकाणी झाले, या शाखेच्या माध्यमातून आपल्या परिसरातील गोरगरीब जनतेचे जे काही प्रश्न असतील ते निश्चितपणे सोडवले जातील याची मला खात्री आहे,त्याचबरोबर या संघटनेसोबत माझे जिव्हाळ्याचे नाते आहे .सातत्याने या संघटनेच्या माध्यमातून होणाऱ्या सामाजिक कार्यात मी माझे मार्गदर्शन करत असतो, सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी काम करत असताना संघटनेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विजय जरे यांनी व्यावसायिक क्षेत्रात पदार्पण करत ओम साई मेडिकल शुभारंभ केले आहे.
सामाजिक चळवळीत काम करत असताना व्यवसाय,उद्योग क्षेत्रात देखील मराठा तरुणांनी पुढे आले पाहिजे. इच्छाशक्तीच्या बळावर मराठा तरुण काहीही करू शकतो हे आज विजय जरे यांनी दाखवून दिले आहे,तसेच मेडिकल व्यवसाय करत असताना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही औषध शक्यतो देऊ नये कारण हा व्यवसाय अत्यंत काळजीपूर्वक करण्याचा आहे.असा मोलाचा सल्ला महाराज यांनी यावेळी विजय जरे यांना दिला.
छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर हे बोलताना म्हणाले की, संघटनेतील तरुण कार्यकर्ता विजय जरे एक आदर्श पदाधिकारी आहे, सतत सामाजिक क्षेत्रात संघटनेचे नाव उंच शिखरावर नेण्यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात, त्यांचे कार्य महाराष्ट्रातील अनेक तरुण पदाधिकाऱ्यांना प्रेरणादायी आहे. इतर पदाधिकाऱ्यांनी सुद्धा विजय जरे यांचा आदर्श घेऊन सामाजिक काम करत असताना व्यवसायात सुद्धा पाऊल टाकले पाहिजे. मराठा तरुणांना व्यवसायात आल्याशिवाय आता पर्याय नाही त्यामुळे स्वतःच्या हिमतीवर स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी मराठा तरुणांनी आता वेगवेगळे व्यवसायातील पर्याय निवडायला हवे.
विजय जरे यांनी जो नवीन व्यवसाय सुरू केला आहे त्यासाठी आमच्या सर्वांच्या शुभेच्छा ह्या सदैव त्यांच्या सोबत आहे. याप्रसंगी संघटनेचे प्रदेश महासचिव शिवाजीराजे मोरे , विद्यार्थी प्रदेश आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रा उमेश शिंदे , प्रमुख पाहुणे मराठा क्रांती मोर्चा चे राज्य समन्वयक अप्पासाहेब कुडेकर,तुषार जगताप यांसह संघटनेचे शेतकरी आघडी प्रदेशाध्यक्ष पंकज जऱ्हाड,पश्चिम महा.अध्यक्ष विशाल गव्हाणे,प्रदेश प्रवक्ते गणेश राऊत,पुणे जिल्हा अध्यक्ष सागर भोसले,नाशिक जिल्हा अध्यक्ष विजय खर्जुल,पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमितजी सोनवणे,पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष निकेत कासार, पुणे जिल्हा विध्यार्थी आघाडी अध्यक्ष राजू फाले, जिल्हा संपर्कप्रमुख दीपक जाधव, पुणे शहर अध्यक्ष बिपीन दिवेचा,पुणे शहर उपाध्यक्ष रवी सातपुते,पुंडलिक बोडके,भारत पिंगळे,मयूर पांगारकर,सागर शेजवळ,सतीश नवले, अविनाश गायकर,प्रितेश पाटील,गणेश वाकचौरे,पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष विशाल वाघमारे, संपर्कप्रमुख अजित नरोटे, संघटक अक्षय पवार, विधानसभा अध्यक्ष संजय ठाकरे, महिलाध्यक्ष विद्याताई शेवाळे, शाखा प्रमुख नानासाहेब वाबळे, व इतर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विजय जरे यांनी केले होते. उपस्थित मान्यवरांचे आभार जिल्हाध्यक्ष सागर भोसले यांनी मानले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विशाल गव्हाणे यांनी केले.
