दापुर च्या हौसाआई च्या संस्काराच्या शिदोरी ने आव्हाड कुटुंबास दिली जीवनात आलेल्या संकटाशी लढण्याची ताकद

नाशिक मिरर : गाव-दापूर ता. सिन्नर – गं.भा.हौसाबाई दादा आव्हाड यांची वयाची ९५ वर्ष पूर्ण झाले.परिवारातील सगळ्यांनी एकत्र येऊन आईचा वाढदिवस उत्साहात साजरा केला. हौसाबाई यांना एकूण ३ मुलं आणि २ मुली असा मोठा परिवार, हौसाबाई यांनी खुप कष्ट व मोल-मजुरी करून सर्वांचे शिक्षण पूर्ण केले. मोठा मुलगा दगडू हे मुंबई पोलिस मध्ये पोलीस निरीक्षक (P.I) म्हणून कार्यरत होते. तर जगन्नाथ हे प्रगतशील शेतकरी आहेत. आणि सोमनाथ हे सातपूर औद्योगिक वसाहती मध्ये सिएट टायर कंपनी मध्ये आहे. व दोन्ही मुलीची लग्न झाली आहेत.

हौसाबाई यांनी बंधारे ,विहारी चे खोदकामे रस्ता बांधणी अशी अनेक कामे करून कुटुंबाचा उधरनिर्वाह करून मुलांना लहानाचे मोठे केले. आई ची परिस्थिती हलकीची हसूनही मोठा मुलगा दगडू यांना जुनी मॅट्रिक पर्यंत शाळा शिकवली नंतर दगडू हे पोलिसात भरती झाले. तिथून पुढे मोठ्या मुलाची मदत आणि आई हौसाबाई यांनी मोल मजुरी आणि शेती उत्पन्न च्या साहाय्याने कुटुंबा वरती असलेले कर्ज आणि आमचे सर्वांचे शिक्षण, मूलभूत गरजा आई ने ऊन,वारा,पाऊस न बघता मोठ्या जिद्दीने पूर्ण केल्या.


आज गावात वडिलोपार्जित जितकी शेती आहे.तिच्या एवढीच शेतजमीन आमच्या आई ने तिच्या कष्टाने विकत घेतली. आम्हा सर्वांना तिने स्वतःच्या पायावर उभ केलं. आम्ही मुलं- मुली,नातू-पनतू असा आमचं आता मोठ कुटुंब आहे.
आज लिहायला आणि सांगायला अशा खूप गोष्टी आहेत. परंतु समाजात एक उदाहरणं म्हणून आमच्या हौसा आई सारख्या असंख्य जुन्या लोकांनी जे काही कुटुंबासाठी व मुलांन साठी जे काही कष्ट करून मुलांना स्वतः च्या पायावर व जीवनात येणाऱ्या असंख्य संकटावर मात करण्यास शिकवले. त्याचा विचार आपण सगळ्यांनी व पुढच्या पिढीने नक्की करणे आवश्यक आहे.

आमच्या वरती आई ने केलेल्या संस्कारांन मुळे आजही आईची संस्काराची शिदोरी आई आमच्या जवळ आहे. आज तिला खरी आमची गरज आहे. आई ने आपल्याला हे जग दाखवलं म्हणून तुम्ही आम्ही या सृष्टीचा आनंद घेत आहे. आपल्या अनमोल आयुष्यात आपल्या आई-वडीलांन मुळेच आज आम्ही इतके मोठे आहोत. असा विचार प्रत्येक जण जेव्हा करेल आणि आपल्या कुटूंबातील प्रत्येक सदस्यास या गोष्टीची जान करून देईल तेव्हा समजतील वृद्धाअश्रमांची गरज कोणालाच पडणार नाही.

बातम्या

Don`t copy text!