तुम्ही कधी जेलमध्ये गेलाय काय ? हो.…हो जेल मध्येच. तुम्ही म्हणाल काहीही काय विचारताय? आम्ही काय गुन्हेगार आहोत का जेलमध्ये जायला. तुमचंही म्हणणं खरंच आहे की ! काहीतरी गुन्हा केल्याशिवाय तुम्हाला आत नेणार तरी कशाला? अन तसंही जेलमध्ये म्हणजेच कारागृहात जाणे नकोच कारण आपल्याला माहिती आहे कि कारागृहात जाणे म्हणजे एक प्रकारे कडक शिक्षा भोगणे कारण येथील प्रशासनाचे नियम फारच कडक आणि अंगावर काटाआणणारे. तसेही आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेला आणि अन्य कुणाला कारागृहात सहजासहजी प्रवेश नसतोच. कारागृहात तर ‘परिंदा भी पर नही मार सकता‘ अशी अवस्था आणि अगदी त्या थाटाचा चोख बंदोबस्त असतो बघा तिथं. त्यामुळे अभेद्य भिंती पलीकडचं जग नेमकं असतं तरी कसं हा कुतूहलाचा विषय ठरतो.
आपल्यापैकी कित्येक जणांनी किंबहुना सर्वानीच जेल प्रत्यक्ष नाही पण चित्रपटांतून तर नक्कीच पाहिले असणार. कितीतरी चित्रपटांत दाखविल्या गेलेल्या कारागृहांतील दृष्यांमुळे जेल पाहण्याची इच्छा मात्र तुम्हाला नक्कीच झाली असणार. तुम्हाला जेलमध्ये जायला मिळाले तर? अहो मजाक नाही खरच सांगतोय. कॉम्प्युटर क्षेत्रात इंजिनियर ची डिग्री घेऊन त्यानंतर एम. टेक. पर्यंतचे शिक्षण विशेष प्रविण्याने घेतलेल्या अन इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचा दांडगा अनुभव असलेल्या एका उमद्या प्राध्यापक तरुणाने ‘सलाखों के पिछे‘ जाण्याची अफलातून संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलीय.
ती कशी ? अरे हो, जरा थांबा! तेच तर सांगतोय आम्ही. पाहता क्षणी जेल भासावे असे हॉटेल या तरुणाने अगदी लीलया साकारलंय. जेलमध्ये असते तशी अभेद्य भिंत, एक माणूस वाकून जाईल असे छोटेसेच प्रवेशद्वार, जेलमध्ये असतात तशा वेगवेगळ्या बराकी असं सगळं नजरे पलीकडचं विश्व तुम्हाला येथे पहायला अन अनुभवायला मिळते. अहो इतकेच काय तुम्ही तिथे पोहोचताच तुमचे स्वागत करायला भेटतील पोलीस गणवेशातील कर्मचारी आणि हो तुम्हाला येथे सेवा द्यायला कैदीही असतात बरं का. कैद्याच्या गणवेशातील वेटर तुमच्या पुढ्यात येऊन उभे ठाकतात आणि तुम्हाला नम्रपणे सेवा देतात. कैद्यांना वाढले जाते तसे पण स्वादिष्ट आणि रुचकर पदार्थ तुम्हाला वाढले जातात. जेलचे विश्व तुम्हाला न्याहाळता येते ते ही आवडीच्या पदार्थांवर यथेच्छ ताव मारत. व्हेज, नॉन व्हेज, तंदूर, चायनीज, पंजाबी, महाराष्ट्रीयन अशा येथील सर्वच पदार्थांची चव अगदी जिभेवर रेंगाळणारी अशीच. एकदा आलात तर पुन्हा पुन्हा यावंस वाटेल याची खात्री आहे आम्हाला.
आता तुम्ही म्हणाल, अहो आम्हाला नक्की यायला आवडेल पण ही जेलची सफर घडविणारे हॉटेल आहे तरी कुठं? याचं लोकेशनही जरा हटके आहे बरं का. नाशिक शहरापासून जवळ पण तरीही शहरातील भाऊगर्दीपासून अलिप्त अशा जागी. त्यामुळं येथे पोहोचण्याचा प्रवास म्हणजे छोटी सहलच. नाशिकच्या गंगापूर रोडवरील बारदान फाट्या पासून अवघ्या दोन कि.मी. वर असणार्या फाशीच्या डोंगराच्या पायथ्याशी, सुला वाईनच्या अलीकडे दीड दोन किलोमीटरच्या परिसरात. हे हॉटेल आहे फाशीच्या डोंगराजवळ त्यामुळे एक वेगळेच निसर्गरम्य सानिध्य लाभलेले हे ठिकाण आपल्याला खूपच छान अनुभव देईल याची आहे खात्री. येथील सेल्फी पॉईंट्स तुमचा हा अनुभव आणखी अविस्मरणीय करतील यात शंकाच नाही आणि आपण खरोखरच एका जेल मध्ये जाऊन आलो याची अनुभूती आपणास नक्की देईल. चला तर मग हे आगळं वेगळं हॉटेल तुमची वाट पाहतंय एक नवीन अनुभव घ्यायला. तर मग कधी येताय जेलची सफर करायला…..!
Disclaimer: The Nashik Mirror is not liable for any offers, discounts, or data provided by hotel owners. This content is considered paid news, and readers are encouraged to verify information independently before making any decisions based on the advertised content.



