मुंबई, दि. 2 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व ज्येष्ठ विचारवंत भालचंद्र मुणगेकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या अॅपवरून शुक्रवार दि. 3, शनिवार दि. 4 आणि सोमवार दि. 6 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार व निवेदक रणधीर कांबळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
सहा डिसेंबर हा दिवस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून पाळला जातो. या दिवशी डॉ. बाबासाहेबांना सर्वत्र अभिवादन केले जाते. या दिनाच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांचे देशाच्या उभारणीतील योगदान, परिवर्तनविषयक विचार, महिलांच्या प्रगतीसाठी दिलेले योगदान, शेतकरी हिताचे कायदे. पत्रकारितेतील योगदान, अर्थविषयक विचार, प्रेरणादायी संदेश आदी विषयांची माहिती श्री. मुणगेकर यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.
